इंडियन सुपर लीग फुटबॉल : अ‍ॅटलेटिको डे कोलकाताला तिसरे विजेतेपद

करोनाच्या भीतीमुळे गोव्यातील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर प्रेक्षकांविनाच अंतिम फेरीचा थरार रंगला.

(संग्रहित छायाचित्र)

अ‍ॅटलेटिको डे कोलकाताने (एटीके) अंतिम फेरीत अपेक्षेप्रमाणे चेन्नईयन एफसीचा ३-१ असा पाडाव करत इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉलच्या तिसऱ्या विजेतेपदाला गवसणी घातली.

जेवियर हेर्नाडेझ (१०व्या आणि ९३व्या मिनिटाला) तसेच इडू गार्सिया (४८व्या मिनिटाला) यांनी केलेले गोल एटीकेच्या विजयात मोलाचे ठरले. चेन्नईयन एफसीकडून वालस्किस (६९व्या मिनिटाला) याने एकमेव गोल केला. करोनाच्या भीतीमुळे गोव्यातील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर प्रेक्षकांविनाच अंतिम फेरीचा थरार रंगला.

एटीकेने हेर्नाडेझच्या गोलमुळे पहिल्या सत्रात १-० अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर गार्सियाने गोल करत ही आघाडी वाढवली. पण वालस्किसच्या गोलमुळे चेन्नईयनने सामन्यात पुनरागमन केले. अतिरिक्त वेळेत हेर्नाडेझने दुसरा गोल करत एटीकेच्या विजयावर मोहोर उमटवली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian super league football atk win third title abn