scorecardresearch

इंडियन सुपर लीग फुटबॉल : हैदराबादला पहिल्यांदा ‘आयएसएल’चे विजेतेपद

हैदराबाद एफसी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये केरळ ब्लास्टर्सचा ३-१ पराभव करत इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेचे पहिल्यांदा जेतेपद मिळवले.

पीटीआय, मडगाव

हैदराबाद एफसी संघाने पेनल्टी शूटआऊटमध्ये केरळ ब्लास्टर्सचा ३-१ पराभव करत इंडियन सुपर लीग (आयएसएल) स्पर्धेचे पहिल्यांदा जेतेपद मिळवले.

पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमनीने तीन पेनल्टीचा बचाव करत हैदराबादच्या जेतेपदामध्ये निर्णायक भूमिका पार पाडली.  त्यापूर्वी निर्धारित आणि भरपाई वेळेत सामना १-१ असा बरोबरीत होता. शूटआऊटमध्ये हैदराबाद संघाकडून जोओ व्हिक्टर, खासा कामरा आणि हालीचरण नरझारे यांनी गोल मारले. केरळ ब्लास्टर्सकडून एकमेव गोल आयुष अधिकारीने मारला. कट्टीमनी हा हैदराबाद संघाच्या जेतेपदाचा नायक ठरला. त्याने शूटआऊटमध्ये मार्क लेस्कोव्हिच, निशू कुमार आणि जिकसन सिंगच्या पेनल्टी रोखल्या.

त्यापूर्वी, २२ वर्षीय राहुल केपीने ६८ व्या मिनिटाला गोल मारत केरळला आघाडी मिळवून दिली. मात्र, हैदराबादच्या साहिल तवोराने ८८ व्या मिनिटाला गोल झळकावत सामना बरोबरीत आणला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian super league football hyderabad wins isl title firsttime amy

ताज्या बातम्या