भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यावर अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही; परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राष्ट्रीय निवड समितीला २९ जूनला दिल्ली येथे संघ जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत.
अव्वल खेळाडूंच्या अनुपलब्धतेबाबत निवड समितीकडे अद्याप कोणतीही माहिती आलेली नाही, असे स्पष्टीकरण निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी सांगितले.वर्षभरातील व्यस्त क्रिकेट कार्यक्रमाच्या पाश्र्वभूमीवर झिम्बाब्वे दौऱ्यासाठी दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा विचार होण्याची शक्यता अधिक आहे, अशी क्रिकेटवर्तुळात चर्चा आहे.झिम्बाब्वे दौऱ्यावर झी नेटवर्कच्या टेन स्पोर्ट्सवरून क्रिकेट सामन्यांचे प्रक्षेपण होईल, कारण झिम्बाब्वे क्रिकेट मंडळाचा या क्रीडा वाहिनीशी करार आहे; परंतु बीसीसीआय याबाबत अनुकूल नाही. त्यामुळे हा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे. हा दौरा पुढील वर्षी होऊ शकेल, असेही म्हटले जात आहे. मात्र बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
बीसीसीआयच्या अधिकृत संकेतस्थळावर मात्र झिम्बाब्वे दौऱ्याचा कार्यक्रम प्रकाशित करण्यात आला आहे.