ऑस्ट्रेलियाकडून शनिवारी सहा गडी राखून पराभूत झाल्यानंतर ‘आयसीसी’ महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारताची उपांत्य फेरीची वाट बिकट झाली आहे. विश्वचषकातील विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करणारा मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ हा उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ ठरला आहे.

कर्णधार मिताली राज (९६ चेंडूंत ६८ धावा), यास्तिका भाटिया (८३ चेंडूंत ५९ धावा) आणि हरमनप्रीत कौर (४७ चेंडूंत नाबाद ५७ धावा) यांच्या अर्धशतकी खेळींमुळे भारताने ७ बाद २७७ धावसंख्या उभारली. भारताच्या डावात मिताली राज आणि यास्तिका भाटियाने तिसऱ्या गडय़ासाठी १३० धावांची भागीदारी रचली.  मग ऑस्ट्रेलयिाच्या डावात सलामीची फलंदाज एलिसा हिली (६५ चेंडूंत ७२ धावा) आणि राशेल हेन्स (५२ चेंडूंत ४३ धावा) यांनी १२१ धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात करून दिली; नंतर लॅनिंगने (१०७ चेंडूंत ९७ धावा) संघाचा विजय सुनिश्चित केला. झुलन गोस्वामीच्या शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाला आठ धावांची आवश्यकता होती; पण बेथ मूनीने (२० चेंडूंत नाबाद २० धावा) तीन चेंडूंमध्येच विजयावर शिक्कामोर्तब केले.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
IPL 2024 Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad Match Updates in Marathi
IPL 2024 KKR vs SRH: आंद्रे रसेलच्या वादळापुढे हैदराबादची गोलंदाजी हतबल, केकेआरने उभारला २०० हून अधिक धावांचा डोंगर
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: चार दिवसांपूर्वी स्ट्रेचरवर, आज चेन्नईचा हिरो; मुस्ताफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर आरसीबीने टेकले गुडघे