Indian Team Stuck in Traffic: इंग्लंडविरूद्ध पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील अखेरचा सामना भारतासाठी प्रतिष्ठेचा सामना असणार आहे. हा पाचवा टी-२० सामना साऊथम्पॅटनमध्ये खेळवला जाणार आहे. पण भारतीय संघ नाणेफेकीची वेळ टळून गेली तरी स्टेडियममध्ये दाखल झाला नव्हता. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच विचित्र कारणामुळे सामना उशिरा सुरू होणार आहे, पाहूया काय घडलं?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्याची नाणेफेक उशिरा होणार आहे. ट्रॅफिकमध्ये अडकल्याने भारतीय संघाला साऊथहॅम्प्टन येथील ‘रोस बाउल’ स्टेडियममध्ये वेळेवर पोहोचता आलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय संघ बराच वेळ वाहतूक कोंडीत अडकून पडला होता; त्यामुळे नियोजित वेळेवर नाणेफेक होऊ शकली नाही आणि परिणामी सामना सुरू होण्यास अर्धा तास उशीर झाला.

शनिवार, ११ जुलै रोजी साऊथम्पॅटन येथील स्टेडियममध्ये टी-२० मालिकेतील अंतिम सामना पाहण्यासाठी प्रेक्षक जमले होते. मात्र, जेव्हा भारतीय खेळाडू मैदानावर दिसले नाहीत, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. त्यानंतर थोड्याच वेळात जेव्हा नाणेफेक (टॉस) झाली नाही, तेव्हा यामागचं कारण समोर आलं. भारतीय संघ ट्रॅफिकमध्ये अडकल्याने अद्याप मैदानावरच दाखल झाला नव्हता.

यानंतर सामन्याच्या नाणेफेकीची वेळ टळून गेल्यानंतर काही वेळाने भारतीय संघ स्टेडियममध्ये अखेरीस दाखल झाला. यानंतर भारतीय संघ स्टेडियममध्ये पोहोचल्यानंतर ७.१५ वाजता नाणेफेक घेण्यात आली आणि ७.३० वाजता सामना सुरू झाला. भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये दोन मोठे बदल करण्यात आले. वैभव सूर्यवंशीला ड्रॉप करत संजू सॅमसनला संधी देण्यात आली. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरच्या जागी सूर्यांश शेडगेला संधी दिली गेली.

भारताची प्लेईंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव, प्रसीध कृष्णा

इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन)

फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रूक (कर्णधार), जेकब बेथल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग