scorecardresearch

Indian Team Schedule: टीम इंडिया नवीन वर्षात ‘या’ संघांचा करणार सामना; खेळाडूंसाठी असणार अतिशय व्यस्त कार्यक्रम

Indian Team Schedule 2023: भारतीय संघाचे २०२३ मधील वेळपत्रक व्यस्त असणार आहे. या वर्षात भारतीय संघाला आशिय चषक आणि एकदिववसीय विश्वचषक देखील खेळायचा आहे.

Indian Team Schedule: टीम इंडिया नवीन वर्षात ‘या’ संघांचा करणार सामना; खेळाडूंसाठी असणार अतिशय व्यस्त कार्यक्रम
भारतीय क्रिकेट संघ (संग्रहित छायाचित्र इंडियन एक्सप्रेस)

नवीन वर्षात, टीम इंडिया आपली पहिली मालिका श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे. या मालिकेला टी-२० सामन्याने होणार आहे. दोन्ही संघातील पहिला टी-२० सामना ३ जानेवारी मुंबईत खेळला जाणार आहे. त्याचबरोबर वर्षाच्या शेवटी आशिया चषक २०२३ खेळला जाणार आहे. तसेच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धाही नवीन वर्षात . आयोजित करण्यात येणार आहेत. भारतीय क्रिकेटर्ससाठी हे वर्षही खूप व्यस्त असणार आहे. जाणून घेऊया टीम इंडियाचे २०२३ सालचे वेळापत्रक.

नवीन वर्षात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध पहिली मालिका खेळणार आहे. ही भारतात होणारी मालिका आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेनंतर तितक्याच एकदिवसीय सामने खेळवले जातील. या वर्षी एकदिवसीय विश्वचषक होणार असल्याने भारताचे लक्ष टी-२० पेक्षा एकदिवसीय मालिकेवर असेल. हा विश्वचषक फक्त भारतातच होणार आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका टी-२० मालिका –

पहिला सामना: ३ जानेवारी (मुंबई)
दुसरा सामना: ५ जानेवारी (पुणे)
तिसरा सामना: ७ जानेवारी (राजकोट)

भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिका –

पहिला सामना: १० जानेवारी (गुवाहाटी)
दुसरा सामना: १२ जानेवारी (कोलकाता)
तिसरा सामना: १५ जानेवारी (त्रिवेंद्रम)

हेही वाचा – PAK vs NZ: पत्रकार मोठ्याने ओरडल्याने बाबर आझमने दिली खतरनाक रिएक्शन, व्हिडिओ होतोय व्हायरल

भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका –

पहिला सामना: १८ जानेवारी (हैदराबाद)
दुसरा सामना: २१ जानेवारी (रायपूर)
तिसरा सामना: २४ जानेवारी (इंदौर)

भारत विरुद्ध न्यूझीलंड टी-२० मालिका –

पहिला सामना: २७ जानेवारी (रांची)
दुसरा सामना: २९ जानेवारी (लखनौ)
तिसरा सामना: १ फेब्रुवारी (अहमदाबाद)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका –

पहिला सामना : ९ ते १३ फेब्रुवारी (नागपूर)
दुसरा सामना: १७ ते २१ फेब्रुवारी (दिल्ली)
तिसरा सामना: १ ते ५ मार्च (धर्मशाला)
चौथा सामना: ९ ते १३ मार्च (अहमदाबाद)

हेही वाचा – Rishabh Pant Car Accident: पाकिस्तानच्या खेळाडूंनी ऋषभ पंतसाठी केली प्रार्थना; मैदानावर लवकर परतण्यासाठी दिल्या शुभेच्छा

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका –

पहिला सामना: १७ मार्च (मुंबई)
दुसरा सामना: १९ मार्च (विशाखापट्टणम)
तिसरा सामना: २२ मार्च (चेन्नई)

एप्रिलमध्ये आयपीएल २०२३चे आयोजन –

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेनंतर इंडियन प्रीमियर लीग होणार आहे. आयपीएल १ एप्रिलपासून सुरू होऊ शकते, जे मे अखेरपर्यंत सुरू राहील. आयपीएलमधील १० संघांदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत सर्व महत्त्वाचे खेळाडू सहभागी होणार आहेत.

आशिया कप २०२३ –

आशिया चषक या वर्षी होणार आहे, ही स्पर्धा पाकिस्तानमध्ये होणार असा अधिकृत निर्णय घेण्यात आला होता. मात्र, आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी भारत पाकिस्तानमध्ये जाणार नसल्यामुळे आशिया चषक स्पर्धेचे ठिकाण बदलण्यात येणार असल्याची पुष्टी केली आहे. सप्टेंबरमध्ये होणारा आशिया चषक यावेळी वनडे फॉरमॅटमध्ये खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – Rishabh Pant Car Accident: पंतला मैदानात परतण्यासाठी लागणार ‘इतका’ कालावधी; पाहा, काय म्हणाले डॉक्टर

एकदिवसीय विश्वचषक २०२३ –

यंदा भारतीय क्रिकेट संघाचे लक्ष वनडेवर असणार आहे. आशिया चषक देखील एकदिवसीय फॉर्मेटचा असेल आणि विश्वचषकही याच फॉरमॅटमध्ये होईल. गेल्या वर्षी आशिया चषक आणि विश्वचषक दोन्ही टी-२० फॉरमॅटमध्ये खेळले गेले होते. या दोन्हीमध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली नव्हती. भारताने पहिला एकदिवसीय विश्वचषक १९८३ मध्ये जिंकला होता, तर दुसरा २०११ मध्ये जिंकला होता. यावेळी संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या विश्वचषकाच्या शोधात असेल. भारतात होणारा हा एकदिवसीय विश्वचषक ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान खेळवला जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-12-2022 at 13:59 IST

संबंधित बातम्या