मियामी खुली  टेनिस स्पर्धा : प्रज्ञेशची मुख्य फेरीत धडक

मियामी : भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरन याने जय क्लार्क याचा पराभव करत मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत धडक मारली आहे. एटीपी मास्टर्स स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा मुख्य फेरीत खेळण्याची किमया त्याने साधली आहे. प्रज्ञेशने पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या जय क्लार्क याचा ६-४, ६-४ असा सहज पराभव केला. एटीपी क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोत्तम ८४व्या […]

भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरन
मियामी : भारताचा एकेरीतील अव्वल टेनिसपटू प्रज्ञेश गुणेश्वरन याने जय क्लार्क याचा पराभव करत मियामी खुल्या टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत धडक मारली आहे. एटीपी मास्टर्स स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा मुख्य फेरीत खेळण्याची किमया त्याने साधली आहे.

प्रज्ञेशने पात्रता फेरीच्या दुसऱ्या सामन्यात ग्रेट ब्रिटनच्या जय क्लार्क याचा ६-४, ६-४ असा सहज पराभव केला. एटीपी क्रमवारीत कारकीर्दीतील सर्वोत्तम ८४व्या स्थानी मजल मारणाऱ्या प्रज्ञेशने सकारात्मक सुरुवात करत पहिल्याच गेममध्ये क्लार्कची सव्‍‌र्हिस भेदली. पुढील गेममध्ये त्याने दोन ब्रेकपॉइंट वाचवले आणि पहिला सेट आपल्या नावावर केला.

दुसऱ्या सेटमध्येही प्रज्ञेशने शानदार सुरुवात करत पहिल्याच गेममध्ये प्रतिस्पध्र्याची सव्‍‌र्हिस भेदून आघाडी घेतली. त्यानंतर क्लार्कने दोन ब्रेकपॉइंट वाचवले, मात्र प्रज्ञेशचा झंझावात तो रोखू शकला नाही. आता प्रज्ञेशला मुख्य फेरीच्या पहिल्या लढतीत स्पेनच्या जाऊमे मुनार याच्याशी दोन हात करावे लागतील. प्रज्ञेशने गेल्या आठवडय़ात इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेची मुख्य फेरी गाठली होती. या स्पर्धेत दमदार कामगिरी करत प्रज्ञेशने तिसऱ्या फेरीपर्यंत मजल मारली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian tennis player prajnesh gunneswaran enter in main round