दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पुजारा पुन्हा मैदानात, सरावाला केली सुरुवात

सोशल मीडियावर पोस्ट केला फोटो

करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका जगभरातील क्रीडा क्षेत्रालाही बसला. भारतातही बीसीसीआयसह सर्व महत्वाच्या क्रीडा संघटनांनी आपले सर्व सामने रद्द केले होते. मात्र यामधून होणारं आर्थिक नुकसान लक्षात घेता आयसीसी आणि बीसीसीआय क्रिकेटचे सामने पुन्हा सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. आयसीसीने खेळाडूंना सराव सुरु करण्यासाठी खास नियमावलीही आखून दिली आहे. यानुसार काही खेळाडूंनी सरावाला सुरुवातही केली आहे.

भारतीय कसोटी संघाचा सर्वात भरवशाचा खेळाडू चेतेश्वर पुजारानेही अखेरीस सरावाला सुरुवात केली आहे. पुजाराने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर फलंदाजीचा सराव करण्यासाठी पॅड बांधतानाचा फोटो पोस्ट केला आहे.

शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव या खेळाडूंनीही सरावाला सुरुवात केली आहे. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ भारतीय क्रिकेटपटू घरात बसून असल्यामुळे त्यांनाही मैदानावर परतण्याची घाई झालेली आहे. २०२० वर्षात जानेवारी महिन्यात भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत पुजारा सहभागी झाला होता. मात्र या मालिकेत त्याला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नव्हती. वर्षाअखेरीस भारत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे, त्यावेळी पुजारा कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian test team specialist cheteshwar pujara start practicing again after lockdown psd

ताज्या बातम्या