रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय सामनाधिकाऱ्यांची निवड

भारतीय कुस्ती सामनाधिकाऱ्यांची क्रीडा विश्वातील सर्वोच्च स्पर्धेसाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कुमार

पुढील वर्षी ब्राझीलमधील रिओ येथे होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय  सामनाधिकारी अशोक कुमार यांची निवड झाली आहे. भारतीय कुस्ती सामनाधिकाऱ्यांची क्रीडा विश्वातील सर्वोच्च स्पर्धेसाठी निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जगभरातून ५० सामनाधिकारी, निरीक्षक ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत. जागतिक कुस्ती असोसिएशनने आशिया खंडातून नऊ सामनाधिकाऱ्यांची निवड केली. कुमार सध्या एअर इंडियात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

लास व्हेगास येथे झालेल्या जागतिक वरिष्ठ कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा आणि त्यानंतर झालेल्या कार्यशाळेतील प्रदर्शनावर सामनाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. कुमार यांनी पन्नासपेक्षा अधिक स्पर्धामध्ये सामनाधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian umpire selection for the rio olympics

ताज्या बातम्या