बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी चमकदार कामगिरी सुरू ठेवली आहे. स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी वेटलिफ्टर जेरेमी लालरिन्नुगाने ६७ किलो वजनी गटात एकूण ३०० किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले आहे. २०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले आहे. जेरेमीने स्नॅच इव्हेंटमध्ये १४० किलो वजन उचलून नवीन राष्ट्रकुल विक्रम नोंदवला आहे

१९ वर्षांच्या जेरेमीने क्लीन अँड जर्क विभागात १६० किलो वजन उचलून एकूण ३०० किलो ग्रॅम वजन उचलले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हा देखील एक नवीन विक्रम आहे. १६५ किलो वजन उचलण्याच्या अंतिम प्रयत्नाच्या शेवटी जेरेमीला दुखापत झाल्याने तो शेवटचा प्रयत्न पूर्ण करू शकला नाही. असे असूनही त्याला सुवर्णपदावर आपले नाव कोरण्यात त्याला यश आले. सामोआचा अनुभवी लिफ्टर वैपावा इओनेने एकत्रित २९३ किलो वजन उचलून रौप्यपदक जिंकले, तर नायजेरियाच्या एडिडिओंग उमोफियाने २९० किलो वजन उचलून कांस्यपदक पटकावले.

Who is The Most Successful Olympian
Paris Olympic: २३ सुवर्णपदकं आणि ३९ वर्ल्ड रेकॉर्ड… कोण आहे ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वात यशस्वी खेळाडू?
Indian History In Games Most Medals Hockey
Paris Olympics 2024: ॲथलेटिक्समध्ये पहिले पदक तर हॉकीमध्ये सुवर्णपदक, जाणून घ्या ऑलिम्पिकमध्ये कसा आहे भारताचा इतिहास?
in IND vs PAK Final World Championship Of Legends 2024
इरफान पठाणने कराची कसोटीची करून दिली आठवण, जबरदस्त इनस्विंगरवर युनूस खानला केले क्लीन बोल्ड, पाहा VIDEO
2024 women wimbledon final krejcikova beats paolini to win wimbledon title
Wimbledon Women Final : महिला एकेरीत क्रेजिकोवा सरस; पाओलिनीला नमवत पहिल्या विम्बल्डन जेतेपदावर मोहोर
Portugal knocked out by France in Euro Championship football sport news
फ्रान्सकडून पोर्तुगाल शूटआऊट; अखेरच्या युरो सामन्यात ख्रिास्तियानो रोनाल्डो अपयशी
England beat Slovakia to reach the quarter-finals of the Euro Football Championship sport news
अलौकिक बेलिंगहॅमने इंग्लंडला तारले! स्लोव्हाकियाला नमवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
Suryakumar yadav received best fielder medal from Jay shah video
IND vs SA: सूर्या दादाच्या एका कॅचने फिरवली मॅच! सूर्यकुमारला बेस्ट फिल्डरचं मेडल देताना ड्रेसिंग रूममध्ये…; पाहा VIDEO
T20 World Cup 2024 Prize Money Team India Prize Money Distribution
T20 World Cup Prize Money: भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकताच कोट्यवधींचा वर्षाव, दक्षिण आफ्रिकालाही मिळाली मोठी बक्षिसाची रक्कम

मिझोराममधील आयझोल येथील रहिवासी असलेल्या १९ वर्षीय जेरेमीचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हे पहिलेच वर्ष आहे. त्याने२०१८मधील युवा ऑलिंपिक स्पर्धेत ६२ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते. गेल्या वर्षी झालेल्या राष्ट्रकुल चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याने ६७ किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले होते.

हेही वाचा – IND W Vs PAK W T20 Live in CWG 2022 : भारत विरुद्ध पाकिस्तान ‘सुपर संडे’ लढत; नाणेफेक जिंकून पाकिस्तानचा फलंदाजीचा निर्णय

बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दुसरा दिवस भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी गाजवला. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये भारताला एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कास्य पदकाची कमाई झाली. आज जेरेमीने सुवर्ण पदकाची कमाई केली. त्यामुळे वेटलिंफ्टिंगमध्ये भारताच्या नावावर एकून पाच पदकांची नोंद झाली आहे. या पाच पदकांपैकी दोन पदकं मुलींनी तर तीन मुलांनी जिंकली आहेत. काल (३० जुलै) मीराबाई चानूने सुवर्ण पदकाची कमाई केली होती.