एपी : टेलर फ्रिट्झने पायाच्या दुखापतीकडे दुर्लक्ष करत राफेल नदालचा सलग २० सामान्यांचा विजयरथ रोखत इंडियन वेल्स बीएनपी पारिबा खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवले. पायाच्या दुखापतीमुळे फ्रिट्झला अंतिम सामन्यातून माघार घेण्याचा त्याच्या प्रशिक्षकांनी सल्ला दिला. मात्र अमेरिकेच्या या खेळाडूने सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला आणि स्पेनचा दिग्ग्ज खेळाडू नदालला ६-३, ७-६ (७-५) असे पराभूत करत जेतेपदाला गवसणी घातली. विक्रमी २१ ग्रँडस्लॅम जेतेपदे मिळवणाऱ्या नदालचा या वर्षांतील हा पहिलाच पराभव आहे.

फ्रिट्झला उपांत्य फेरीत सातव्या मानांकित आंद्रे रुब्लेव्हविरुद्धच्या लढतीदरम्यान दुखापत झाली होती. तसेच ३५ वर्षीय नदालही पूर्णपणे तंदुरुस्त नव्हता. अंतिम सामन्यादरम्यान त्याने दोन वेळा वैद्यकीय विश्रांतीदेखील घेतली.

Bernd Holzenbein dead at 78
माजी फुटबॉलपटू होल्झेनबाइन यांचे निधन
Champions League Football Barcelona beat Paris Saint Germain sport news
चॅम्पियन्स लीग फुटबॉल: बार्सिलोनाची पॅरिस सेंट-जर्मेनवर मात
Candidates Chess Tournament D Gukesh defeated Fabiano Caruana
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: गुकेश अपराजितच! अग्रमानांकित कारुआनाला बरोबरीत रोखले; विदित, हम्पी पराभूत
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार