Natin Marli Mithi Viral Video: सध्या सगळीकडे आयपीएल २०२५ ची चर्चा आहे. यंदा दोन नवे संघ आयपीएलच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहे, त्यामुळे यंदा आयपीएलचा नवा विजेता संघ मिळणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स या दोन्ही संघांमध्ये उद्या म्हणजेच ३ जून रोजी अंतिम सामना होणार आहे. आयपीएल प्लेऑफ सामने सुरू असताना भारताच्या महिला क्रिकेटपटूंचा एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये त्या नटीनं मारली मिठी गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.
इन्स्टाग्राम रील्समुळे सध्या विविध गाणी सोशल मिडियावर ट्रेंड होत असतात. सध्या नटीनं मारली मिठी हे गाणं सगळीकडे धुमाकूळ घालतंय. कलाकार, सेलिब्रिटी, इन्फलुएन्सर सर्वांनाच या गाण्याची भुरळ पडली आहे आणि सगळेच जण या गाण्यावरची हुक स्टेप करत डान्स करताना दिसत आहेत. दरम्यान भारताच्या महिला क्रिकेटपटूंनाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरला नाही.
टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटूंनी या गाण्यावर डान्स केलेला व्हीडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. टीम इंडियाची फलंदाज जेमिमा रोड्रिग्जने हा व्हीडिओ पोस्ट केला आहे. या रीलमध्ये जेमिमा रोड्रिग्ज, श्रेयंका पाटील, राधा यादव आणि अरूंधती रेड्डी डान्स करताना दिसत आहेत. जेमिमा आणि अरूंधती बेडवर उभ्या आहेत. तर राधा आणि श्रेयंका खाली उभ्या राहून या गाण्यावरची हुक स्टेप करताना दिसत आहेत.
जेमिमाने शेअर केलेल्या रीलवर एक मिलियन लाईक्स आहेत. २ हजार अधिक कमेंट्स आहेत. जेमिमा ही भारतीय संघातील फारच मस्तीखोर आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारी आहे. जेमिमा सोशल मीडियावर फारच सक्रिय आहे. तिने काही दिवसांपूर्वी टीम इंडियामधील खेळाडूंबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. त्यानंतर तिने सर्वांचे झुम केलेले फोटो त्यामध्ये वेगवेगळे पोस्ट केले होते. स्मृती मानधनाही त्या फोटोमध्ये आहे.
आयपीएल सुरू असताना भारतीय संघ श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकाबरोबर तिरंगी मालिका खेळला. या मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला. स्मृती मानधनाने या मालिकेमध्ये शतक झळकावले होते. यानंतर आता महिलांचा क्रिकेट संघही इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर दोन्ही संघ पाच सामन्यांची टी-२० मालिका तर ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहेत.