नवी दिल्ली :आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी १८ सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा गुरुवारी करण्यात आली. पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने भारताची तारांकित आघाडीपटू राणी रामपालला या संघातही स्थान देण्यात आले नाही.

भारतीय संघाचे नेतृत्व गोलरक्षक सविता पुनिया करणार आहे, तर बचावपटू दिप ग्रेस एक्का उपकर्णधाराच्या भूमिकेत असेल. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन २८ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या दोन्ही खेळाडू नेदरलँड्स आणि स्पेन यांच्या संयुक्त यजमानपदाखाली १ ते १७ जुलैदरम्यान होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत सारख्याच जबाबदाऱ्या पार पाडतील.

भारतीय संघ :

गोलररक्षक : सविता (कर्णधार), रजनी एतिमार्पू; बचावपटू : दिप ग्रेस एक्का (उपकर्णधार), गुरजित कौर, निक्की प्रधान, उदिता; मध्यरक्षक : निशा, सुशीला चानू पुखरम्बाम, मोनिका, नेहा, ज्योती, नवजोत कौर, सलिमा टेटे; आघाडीपटू : वंदना कटारिया, लालरेम्सियामी, नवनीत कौर, शर्मिला देवी, संगीता कुमारी