धावांची टांकसाळ ठरलेल्या मुकाबल्यात स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांच्या तडाखेबंद शतकी खेळीच्या बळावर भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेवर ४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला. भारतीय संघाने दिलेलं डोंगराएवढया लक्ष्याला सामोरे जाताना दक्षिण आफ्रिकेच्या दोन शिलेदारांनीही शतकी खेळी साकारल्या पण भारतीय संघाने टिच्चून खेळ करत सामन्याचं पारडं फिरवलं.

भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ३२५ धावांचा डोंगर उभारला. स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेली १७१ धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. स्मृतीने १८ चौकार आणि २ षटकारांसह १३६ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. हरमनप्रीतने ९ चौकार आणि ३षटकारांसह नाबाद १०३ धावांची दिमाखदार खेळी साकारली. ऋचा घोषने १३ चेंडूत २५ धावा चोपल्या आणि भारतीय संघाने सव्वातीनशेचा टप्पा ओलांडला.

Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Smriti Mandhana Becomes Second Indian Woman Player to Complete 7000 Runs in International Cricket
IND W vs SA W: स्मृती मानधना ठरली टीम इंडियासाठी तारणहार; शतकी खेळीसह ऐतिहासिक कामगिरी करणारी दुसरी भारतीय फलंदाज
Jasprit Bumrah Viral Funny Video Post IND vs ENG
“बुमराह तू ये, माझा हात..”, IND vs ENG मॅच जिंकताच अंपायरच्या भेटीला गेला जसप्रीत पण.. Video पाहून चाहते लोटपोट
IND beat BAN by 50 Runs
IND v BAN: भारताचा बांगलादेशवर ऐतिहासिक विजय, या विजयासह टीम इंडियाने केली वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
Saurabh Netrawalkar Statement on Suryakumar Yadav Dropped Catch
IND vs USA: “तू सूर्यकुमारला का आऊट नाही केलंस?”, नवज्योत सिंग सिद्धूने विचारलेल्या प्रश्नावर नेत्रावळकरने दिले उत्तर; म्हणाला- ‘त्याचा झेल…’

या प्रचंड लक्ष्यासमोर खेळताना दक्षिण आफ्रिकेने विकेट्स गमवायला सुरुवात केली पण लॉरा वॉल्व्हडार्टने १२ चौकार आणि ३ षटकारांसह १३५ धावांची शानदार खेळी केली. क्रमांकावर खेळायला आलेल्या मारिझान कापने ९४ चेंडूत ११ चौकार आणि ३ षटकारांसह ११४ धावांची अविश्वसनीय खेळी साकारली. या दोघींनी स्मृती-हरमनप्रीतप्रमाणे चौथ्या विकेटसाठी १८४ धावांची खंडप्राय भागीदारी रचली. मारिझान बाद झाल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी शिस्तबद्ध मारा करत पुनरागमन केलं. लॉराने एका बाजूने चिवटपणे लढा दिला. शेवटच्या षटकात आफ्रिकेला ६ चेंडूत ११ धावांची आवश्यकता होती पण पूजा वस्राकरने दोन विकेट्स पटकावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. दक्षिण आफ्रिकेला अवघ्या चार धावा कमी पडल्या. भारताकडून पूजा आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स पटकावल्या.

या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या लढतीतही स्मृतीने दिमाखदार शतक झळकावलं होतं. भारतीय संघाने त्या लढतीत १४३ धावांनी विजय मिळवला होता. तिसरा सामना १९ तारखेला बंगळुरू इथेच होणार आहे.