हैदराबाद : वेगवान आणि आक्रमक सुरुवात केल्यानंतरही भारतीय महिला हॉकी संघाचा इंग्लंडच्या अचूक नियोजनबद्ध खेळापुढे निभाव लागला नाही. त्यामुळे विश्वचषक पात्रता हॉकी स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. शनिवारी झालेल्या अंतिम लढतीत इंग्लंडने भारतीय संघाचा २-० असा पराभव केला. मात्र, भारतीय महिला संघाने या वर्षी होणार्या विश्वचषक हॉकी स्पर्धेसाठी पात्रता आधीच सिद्ध केली होती.
जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडला ग्रेस बाल्सडन हिने १३व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करून आघाडीवर नेले. त्यानंतर ४३व्या मिनिटाला एलिझाबेथ नील हिने मैदानी गोल करत ही आघाडी दुप्पट केली. भारतीय संघाने पूर्ण ६० मिनिटे झुंज दिली, परंतु इंग्लंडचा भक्कम बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही. सुरुवातीच्या दहा मिनिटांच्या BCCI Naman Awards 2026. राहुल द्रविड, मिताली राज यांना जीवनगौरव, तर शुभमन गिल आणि स्मृती मनधानाला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार.
वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी. खेळात भारतीय महिलांनी इंग्लंड संघावर चांगला दबाव ठेवला होता. मात्र, नंतर सूर गवसल्यावर इंग्लंडच्या खेळाडूंनी भारतीय महिला खेळाडूंना निष्प्रभ केले. या स्पर्धेतून इंग्लंडसह भारत आणि स्कॉटलंड यांनी विश्वचषकात प्रवेश मिळवला. तिसर्या क्रमांकाच्या लढतीत स्कॉटलंडने इटलीचा १-० असा पराभव केला. या वेळची विश्वचषक स्पर्धा १४ ते ३० ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.
