scorecardresearch

Premium

WTC Final 2023: ऑस्ट्रेलिया पाठोपाठ भारतीय संघाच्याही वाढल्या अडचणी, सरावादरम्यान ‘या’ स्टार खेळाडूला झाली दुखापत

India Vs Australia WTC Final 2023: ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनल सामन्यापूर्वी सराव करताना भारताच्या खेळाडूला दुखापत झाली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाबरोबरच भारतीय संघाच्याही अडचणी वाढल्या आहेत.

India Vs Australia, WTC Final 2023 Match Updates
भारतीय खेळाडू ( फोटो-ट्विटर)

Ishan Kishan has suffered an injury while training: जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याचवेळी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी येत आहे. संघाचा यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन फलंदाजीचा सराव करताना जखमी झाला आहे. रिपोर्टनुसार किशनची दुखापत गंभीर नाही. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दुखापतीमुळे किशन संघाबाहेर गेला, तर टीम इंडियासाठी ते गंभीर संकट ठरू शकते. कारण अगोदरच संघाचा प्रतिभावान यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतही दुखापतीमुळे बाहेर आहे. ‘रेव स्पोर्ट्स’च्या वृत्तानुसार, इशान किशनला फलंदाजीचा सराव करत असतताना दुखापत झाली. त्याची दुखापत फारशी गंभीर नसली तरी. पण ही बाब टीम इंडियासाठी डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते.

Gutami sai mrunmayi
गौतमी देशपांडे ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याला करतेय डेट? सई ताम्हणकरच्या कमेंटवर उत्तर देत मृण्मयी म्हणाली…
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
Ajit Pawar on Sharad Pawar Praful Patel Photo
पक्षातील बंडखोरीनंतरही शरद पवार आणि प्रफुल्ल पटेलांचा एकत्र फोटो, चर्चांना उधाण, अजित पवार म्हणाले…

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डब्ल्यूटीसी फायनल सामन्यासाठी टीम इंडियाने किशन आणि केएस भरतचा यष्टिरक्षक फलंदाज म्हणून समावेश केला आहे. भरत देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करत आहे. परंतु, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर जास्त सामने न खेळल्याने अनुभव कमी आहे. भरतने ४ कसोटीत १०१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम धावसंख्या ४४ धावा होती. किशनची तब्येत ठीक नसेल, तर त्याच्या जागी केएस भरतला संधी मिळू शकते.

केएस भरतची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी –

केएस भरतने प्रथम श्रेणी सामन्यांच्या १४१ डावांमध्ये ४८०८ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने ९ शतके आणि २७ अर्धशतके झलकावली आहेत. त्याने त्रिशतकही झळकावले आहे. भरतची सर्वोत्तम धावसंख्या ३०८ धावा आहे. त्याने लिस्ट एच्या ६४ सामन्यात १९५० धावा केल्या आहेत. भरतने या फॉरमॅटमध्ये ६ शतके आणि ६ अर्धशतके केली आहेत. यामध्ये नाबाद १६१ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.

हेही वाचा – WTC Final 2023: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! ‘हा’ प्रमुख खेळाडू दुखापतीमुळे संघातून झाला बाहेर

डब्ल्यूटीसी फायनलसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकीपर).

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-06-2023 at 18:53 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×