वृत्तसंस्था, अम्मान (जॉर्डन)

भारताच्या काजलने कनिष्ठ (१७ वर्षांखालील) जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत शुक्रवारी सुवर्णपदकाची कमाई केली. अन्य एका सुवर्ण लढतीत महाराष्ट्राची श्रुतिका पाटील पराभूत झाली. त्यामुळे तिला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेतील ४० किलो वजनी गटात बाला राज आणि ५३ किलो वजनी गटात मुस्कानने कांस्यपदक पटकावले. स्पर्धेत मुलींच्या गटात भारताने पाच सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदके कमावली.

Sanju Samson honored by Congress Leader Shashi Tharoor in Thiruvananthapuram
IND vs BAN : शतकवीर संजू सॅमसनचे तिरुअनंतपुरममध्ये जंगी स्वागत, शशी थरुर यांनी पारंपारिक ‘पोनाडा’ शाल देऊन केला गौरव
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Raj Thackeray
Raj Thackeray : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “गेली ९९ वर्ष संघाने…”
Provocative slogans, Rashtriya Swayamsevak Sangh parade, RSS parade, Ratnagiri, RSS parade Ratnagiri,
रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनप्रसंगी प्रक्षोभक घोषणा: चौघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
rupay card launch in maldives
भारताच्या ‘RuPay’ कार्डची सेवा आता मालदीवमध्येही; इतर कोणकोणत्या देशांत चालतं रुपे कार्ड? त्याचा फायदा काय?
Maharashtra dominates archery, archery,
तिरंदाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा दबदबा, युवा आशियाई स्पर्धेत ९ खेळाडूंना पदकाची कमाई, पदक विजेत्यांत पुण्याचे दोन खेळाडू
india vs pakistan womens t20 world cup match preview
पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत चुरस; महिला ट्वेन्टी२० विश्वचषकात आज भारत पाकिस्तान आमने-सामने
One crore reward Manyachiwadi, Manyachiwadi,
सातारा : मान्याचीवाडी अव्वलस्थानासह एक कोटीच्या बक्षिसाची मानकरी, ‘माझी वसुंधरा’ अभियानात प्रथम क्रमांकाची ‘हॅट्रिक’

स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या अंतिम लढतीत काजलने नियोजनबद्ध कुस्ती खेळताना युक्रेनच्या ओलेक्सांड्रा रिबाकचे आव्हान ९-२ असे गुणांवर सहज परतवून लावले. प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व आणि ताबा राखताना काजलने बचावही भक्कम ठेवला आणि रिबाकला संधी मिळू दिली नाही. त्यापूर्वी अंतिम फेरीपर्यंत सहज विजय मिळवणाऱ्या श्रुतिकाला जपानच्या यू कात्सुमेच्या आक्रमकतेचा सामना करता आला नाही. कमालीच्या वेगवान हालचाली करणाऱ्या कात्सुमेने श्रुतिकाला ३९ सेकंदातच तांत्रिक वर्चस्वावर १३-० असे पराभूत केले.

हेही वाचा >>>What is Rest Day: विश्रांतीचा दिवस म्हणजे काय? १५ वर्षांनंतर कसोटीमध्ये परतणार; SL vs NZ कसोटी सामना सहा दिवस का असणार?

दरम्यान, बाला राजने जपानच्या मोनाका युमेकावाचा ११-५ असा, तर मुस्कानने अमेरिकेच्या मारी गोन्झालेसचा १२-२ असा पराभव करून कांस्यपदकाची कमाई केली.मुलांच्या फ्री-स्टाईल गटात भारताच्या पदरी निराशा पडली. पाच वजनी गटांपैकी केवळ दोनमध्ये भारतीय मल्लांना एकेक विजय मिळवता आला. हर्ष आणि विवक यांनाच थोडाफार प्रतिकार करता आला. अन्य तीनही मल्ल पात्रता फेरीतच गारद झाले.