Premium

Asian Games: किरण बालियानने सहाव्या दिवशी पटकावले आठवे पदक; निखत झरीन उपांत्य फेरीत दाखल, स्क्वॉशमध्येही पदक निश्चित

19th Asian Games Updates: चीनमध्ये सुरू असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या किरण बालियानने महिलांच्या गोळा फेक (शॉट पुट) प्रकारात कांस्यपदक जिंकण्यात यश मिळविले आहे. भारताच्या पदकांची संख्या आता ३३ वर पोहोचली आहे.

19th Asian Games 2023 Updates
किरण बालियानने गोळा फेकमध्ये कांस्यपदक जिंकले (फोटो-संग्रहित छायाचित्र जनसत्ता)

Kiran Balian wins bronze medal in women’s shot put at 19th Asian Games: चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या किरण बालियानने महिलांच्या गोळा फेक (शॉट पुट) प्रकारात कांस्यपदक जिंकण्यात यश मिळवले आहे. या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे हे ३३ वे पदक आहे. किरणने तिसऱ्या प्रयत्नात १७.३६ मीटर फेक करून हे पदक जिंकले. या स्पर्धेत चीनच्या खेळाडूंनी सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरण बालियान बद्दल बोलायचे, तर ती मेरठची रहिवासी आहे, जिने २०२३ च्या आशियाई खेळांमध्ये ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये भारतासाठी पदकाचे खाते उघडले आहे. १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांची संख्या आता ३३ वर पोहोचली आहे, ज्यात ८ सुवर्ण, १२ रौप्य आणि १३ कांस्य पदकांचा समावेश आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने आतापर्यंत नेमबाजी स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. यामध्ये २९ सप्टेंबर रोजी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदके जिंकण्यात त्यांनी यश आले. तसेच भारतीय महिला स्क्वॉश संघाला उपांत्य फेरीत हाँगकाँग संघाकडून पराभव पत्करावा लागल्याने कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

हेही वाचा – World Cup 2011: ‘वृत्तपत्र वाचणे, टीव्ही पाहणे बंद करा’; ‘या’ खेळाडूच्या सल्ल्यामुळे भारताने जिंकला विश्वचषक, युवराज सिंगचा खुलासा

निखत झरीनने उपांत्य फेरीत मारली धडक –

भारताची स्टार महिला बॉक्सर निखत झरीनने २९ सप्टेंबर रोजी महिलांच्या ४६ ते ५० किलो गटाच्या उपांत्य फेरीत धडक मारली. तिने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जॉर्डनच्या खेळाडूचा पराभव करून उपांत्य फेरीतील आपले स्थान निश्चित केले आहे. निखतने अवघ्या १२७ सेकंदात सामना जिंकून देशासाठी पदक निश्चित केले. यासोबतच २०२४ मध्ये पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकसाठीही निखतने पात्रता मिळवली आहे. याशिवाय भारताचा पुरुष स्क्वॉश संघही फायनलमध्ये पोहोचला आहे, जिथे त्यांचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indias kiran balian wins bronze medal in womens shot put at 19th asian games 2023 vbm

First published on: 30-09-2023 at 07:27 IST
Next Story
Asian Games: गोळाफेकीत किरण बालियनला कांस्य