न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची प्रतिष्ठा पणाला

जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान टिकवायचे असेल तर भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकावी लागणार आहे.

जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थान टिकवायचे असेल तर भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकावी लागणार आहे. सध्या भारतीय संघ जागतिक क्रमवारीत १२० गुणांसह अव्वल स्थानी आहे तर न्यूझीलंडचा संघ ३६ गुणांसह आठव्या स्थानी आहे. भारताने ही मालिका गमावल्यास अव्वल स्थान हिरावले जाईल तसेच क्रमवारीचे सहा गुणही त्यांना गमवावे लागेल. जानेवारी २०१३ पासून भारतीय संघ क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेतील उसळत्या खेळपट्टय़ावर भारतीय संघाचा दाणादाण उडाली. मात्र त्यांचे क्रमवारीतील अव्वल स्थान अबाधित राहिले. न्यूझीलंड दौऱ्यातील पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेच्या निमित्ताने भारतीय संघासमोर नवे आव्हान उभे ठाकले आहे. न्यूझीलंडमधील स्विंगला साथ देणाऱ्या खेळपट्टय़ा आणि बोचरे वारे अशा आव्हानात्मक परिस्थितीत भारतीय संघाला अव्वल स्थानाची लढाई खेळायची आहे. भारतीय संघाने ही मालिका गमावल्यास ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड संघ अव्वल स्थान पटकावू शकते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indias no 1 odi rank at stake in series against new zealand

ताज्या बातम्या