scorecardresearch

Premium

Asian Games: सरबजोत आणि दिव्याने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदकावर कोरले नाव

19th Asian Games Updates: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी नेमबाजीत भारतीय संघाची पदकांची घोडदौड कायम आहे. सरबजोत आणि दिव्याने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत देशासाठी रौप्यपदक जिंकले.

19th Asian Games in Hangzhou 2023
सरबजोत आणि दिव्याने नेमबाजीत पटकावले रौप्यपदक (फोटो-अनुराग ठाकुर ट्विटर)

Sarabjot and Divya win silver in 10m air pistol mixed team event: चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सातव्या दिवशी भारताला नेमबाजीत आणखी एक पदक मिळाले आहे. भारताच्या सरबजोत आणि दिव्याने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. भारतीय संघाकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र अंतिम फेरीत पराभूत झाल्याने त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारतासाठी नेमबाजीतील हे आठवे रौप्य पदक आहे. एकूणच भारतासाठी नेमबाजीतील हे १९ वे पदक ठरले. नेमबाजीत भारताची कामगिरी सातत्याने चांगली होत आहे.

१० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत यजमान चीन पहिल्या क्रमांकावर राहिला आणि सुवर्णपदक जिंकले. भारताने १४ तर चीनने १६ गुण मिळवले. सातव्या दिवशी भारताचे हे पहिले पदक ठरले. आतापर्यंत भारताच्या खात्यात ३४ पदके जमा झाली आहेत. भारताच्या खात्यातील हे एकूण १३ वे रौप्य पदक ठरले. याशिवाय भारतीय संघाने ८ सुवर्ण आणि १३ कांस्यपदकेही जिंकली आहेत.

19th Asian Games Updates
Asian Games: भारताने २०व्या सुवर्णपदकावर कोरले नाव! दीपिका-हरिंदर या जोडीने मिश्र दुहेरी स्क्वॉश स्पर्धेत नोंदवली सुवर्ण कामगिरी
India vs Korea Hockey: Indian women's hockey team reached the semi-finals the match was drawn 1-1 against South Korea
Asian Games, IND vs KOR: भारतीय महिला हॉकी संघाने गाठली उपांत्य फेरी, दक्षिण कोरियाविरुद्ध साधली १-१ अशी बरोबरी
Asian games 2022 Updates
Asian Games: भारताला सहाव्या दिवशी नेमबाजीत दोन सुवर्णांसह मिळाली पाच पदकं, ऐश्वर्य प्रताप सिंगने पटकावले रौप्यपदक
Asian Games 2023 medals Updates
Asian Games: नेमबाजीत टीम इंडियाची घोडदौड कायम! पुरुषांनी सुवर्ण तर महिला संघाने पटकावले रौप्यपदक

नेमबाजीतील भारताची आतापर्यंतची कामगिरी –

भारताला पहिले सुवर्णपदक नेमबाजीत मिळाले होते. आतापर्यंत भारताने नेमबाजीत १९ पदके जिंकली असून त्यात ६ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारतीय नेमबाज सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीत भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

हेही वाचा – World Cup 2023: भारत आणि इंग्लंड संघात आज रंगणार सराव सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार लाइव्ह स्ट्रिमिंग

लांब उडीतही भारताकडून पदकाची अपेक्षा –

त्याचबरोबर लांब उडीतही भारताकडून पदकाची अपेक्षा आहे. भारतीय खेळाडू मुरली श्रीशंकरने लांब उडीच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले आहे. अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी मुरलीला ७.९० मीटर लांब उडी आवश्यक होती, परंतु त्याने ७.९७ मीटरच्या लांब उडीसह अंतिम फेरीत आपले नाव नोंदवले. हा आकडा त्याने पहिल्याच प्रयत्नात गाठला होता.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indias sarabjot and divya win silver in 10m air pistol mixed team event at 19th asian games in hangzhou 2023 vbm

First published on: 30-09-2023 at 10:41 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×