हॉटेलमध्ये आढळला भारताच्या अंडर १९ संघाच्या फिटनेस ट्रेनरचा मृतदेह

अंडर १९ आणि भारत अ संघाचे ट्रेनर राजेश सावंत

छायाचित्र प्रातिनिधक

भारत अ संघ आणि अंडर १९ संघाचे फिटनेस ट्रेनर राजेश सावंत यांचा रविवारी सकाळी हॉटेलच्या खोलीमध्ये मृतदेह आढळल्याने खळबळ माजली. ह्रदयविकाराने सावंत यांचे निधन झाल्याचा प्राथमिक अंदाज असून या घटनेचा तपास सुरु आहे.

राजेश सावंत हे भारताच्या अंडर १९ संघासोबत सध्या मुंबईत होते. इंग्लंडचा अंडर १९ संघ भारत दौ-यावर येत असून या दौ-यात सावंत हे संघाचे फिटनेस ट्रेनर म्हणून काम बघत होते. रविवारी सकाळी सरावासाठी राजेश सावंत गैरहजर होते. बराच वेळ झाला तरी ते मैदानात येत नसल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. यादरम्यान हॉटेलमधील खोलीत त्यांचा मृतदेह आढळला. बीसीसीयचे सहसचिव अमिताभ चौधरी म्हणाले, आम्ही या घटनेची माहिती मिळताच रत्नाकर शेट्टी यांना घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. सावंत हे ४० वर्षांचे होते.

राजेश सावंत यांनी पूर्वी अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघात फिटनेस ट्रेनर म्हणून काम केले. महिनाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध खेळणा-या भारत अ संघाचेही ते ट्रेनर होते. याशिवास इराणी कपमध्ये शेष भारत संघासाठी त्यांनी ट्रेनर म्हणून काम बघितले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indias under 19 cricket team physical trainer rajesh sawant passes away

ताज्या बातम्या