IndiaW vs PakistanW T20 World Cup Match Today, 12 February 2023 Highlights: भारतीय संघाने रविवारी महिला टी२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होता. केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २०षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९व्या षटकात तीन विकेट्स गमावून लक्ष्य गाठले. जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला अन् पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या. जेमिमाहला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले.

भारताला विजयासाठी शेवटच्या तीन षटकात २८ धावांची गरज होती. मात्र, रिचा आणि जेमिमाह यांच्या मनात काही वेगळेच होते. १८व्या षटकात रिचाने सलग तीन चौकार मारत पहिल्या सामन्याचा मार्गच बदलला. यानंतर तीने १९व्या षटकात पुन्हा तीन चौकार मारून टीम इंडियाला विजय मिळवून दिला. १९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर जेमिमाहला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी एका धावेची गरज होती. तीने चौकार मारून आपले अर्धशतकही पूर्ण केले आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. जेमिमाहच्या टी२० कारकिर्दीतील हे १०वे अर्धशतक होते. जेमिमाहने ५५ चेंडूत ६८ धावा करत नाबाद राहिली आणि रिचाने २५ चेंडूत ४३ धावा केल्या. जेमिमाहने आपल्या डावात सात चौकार मारले, तर रिचाने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. दोघींमध्ये चौथ्या विकेटसाठी नाबाद ५८ धावांची भागीदारी झाली.

Mohammad Amir and Imad Wasim Returns to Pakistan National Team
फिक्सिंग, बंदी आणि निवृत्तीनंतर मोहम्मद आमिर पुन्हा पाकिस्तानच्या टी-२० संघात
IPL 2024 Royal Challenger Bengaluru vs Lucknow Super Giants Match Updates in Marathi
IPL 2024: मयंक यादवचा सामना करायला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज उत्सुक
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा

तत्पूर्वी पाकिस्तानने भारतासमोर १५० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानच्या संघाची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात दीप्ती शर्माने जावेरिया खानला हरमनप्रीत कौर करवी झेलबाद केले. जावेरियाला सहा चेंडूंत आठ धावा करता आल्या. यानंतर मुनीबा अली आणि कर्णधार बिस्माह मारूफ यांनी दुसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी केली. राधा यादवने ही भागीदारी तोडली. तीने मुनिबाला यष्टिरक्षक रिचा घोषच्या हातून स्टंप आऊट केले. पूजा वस्त्राकरने निदा दारला खातेही उघडू दिले नाही आणि रिचाकडे झेलबाद झाली. सिद्रा अमीन ११ धावा करू शकली आणि राधाकरवी झेलबाद झाली.

यानंतर बिस्माहने आयशासोबत पाचव्या विकेटसाठी ४७ चेंडूत ८१ धावांची नाबाद भागीदारी केली. बिस्माहने ५५ चेंडूत ६८ धावांची नाबाद खेळी खेळली. तीने आपल्या खेळीत सात चौकार मारले. त्याचवेळी आयशाने २५ चेंडूत ४३ धावांची तुफानी खेळी केली. आपल्या खेळीत तीने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. शेवटच्या पाच षटकात पाकिस्तानने ५८ धावा केल्या आणि एकही विकेट गमावली नाही. अशा प्रकारे २० षटकांनंतर पाकिस्तानने ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. भारताकडून राधा यादवने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याचवेळी पूजा वस्त्राकर आणि दीप्ती शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Live Updates

India W vs Pakistan W T20 World Cup Highlights Update Score: भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी२० विश्वचषक सामना हायलाइट्स अपडेट्स

21:43 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: भारतीय महिलांनी नोंदवला विश्वचषकातील पहिला विजय

जेमिमाह रॉड्रिग्स-रिचा घोषच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर भारतीय महिलांनी विश्वचषकातील पहिला विजय नोंदवला. पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या.

भारत १५१-३

21:32 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: भारताला १८ चेंडूत २८ धावांची गरज

भारताला १८ चेंडूत २८ धावांची गरज असून ही जोडी टिकून राहणे आवश्यक आहे. सामना रोमांचक स्थितीत आला आहे.

भारत १२२-३

21:28 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: भारताला मोठ्या फटक्यांची गरज

मोठे फटके मारण्याच्या नादात यष्टीरक्षक रिचा घोष बाद झाली होती मात्र रिव्ह्यू घेतल्यानंतर त्यात कळले की चेंडू ग्लोव्हजला लागला होता आणि त्यात ती नाबाद ठरली.

भारत १०९-३

21:17 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: भारताला तिसरा धक्का, हरमनप्रीत कौर बाद

शफाली वर्मा बाद झाल्यानंतर जेमिमाह रॉड्रिग्स-हरमनप्रीत जोडीने भारताचा डाव सावरला होता त्यांच्यात २८ धावांची भागीदारी झाली होती पण ती फोडण्यात नशरा संधूला फोडण्यात यश आले. कर्णधार हरमनप्रीत कौर १६ धावा करून बाद झाली.

भारत ९३-३

https://twitter.com/BCCIWomen/status/1624796831086678018?s=20&t=2PzHf_JCjipu4pslNFJeyw

21:02 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: जेमिमाह रॉड्रिग्स यष्टीचीत होता होता वाचली

नशरा संधूच्या गोलंदाजीवर जेमिमाह रॉड्रिग्स यष्टीचीत होता होता वाचली. भारताला मोठ्या भागीदारीची गरज असून कर्णधार हरमनप्रीत कौरने धावा करणे गरजेचे आहे.

भारत ७३-२

https://twitter.com/JemiRodrigues/status/1559559399034834958?t=JI3tkTRbJccne36Y_Z7YYw&s=08

20:55 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: भारताला मोठा धक्का, शफाली वर्मा बाद

अंडर-१९ वर्ल्डकप विजेती शफाली वर्मा बाद झाली असून हा भारताला मोठा धक्का बसला आहे. तिने २५ चेंडूत ३३ धावा करून बाद झाली. नशरा संधूने बाद करत सिद्रा अमीनने अफलातून झेल घेतला.

भारत ६५-२

20:38 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: भारताला पहिला धक्का, यास्तिका भाटिया बाद

पाकिस्तानने ठेवलेल्या १५० धावांचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली होती. मात्र यास्तिका भाटिया मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाली. तिने १७ धावा केल्या आणि तिला सादिया इक्बालने झेलबाद केले.

भारत ३८-१

https://twitter.com/BCCIWomen/status/1624787252776955905?s=20&t=qa_DWaMl9yRNCC7t2RdNew

20:33 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: शफाली वर्मा पायचीत होता होता वाचली

सादियाच्या षटकात भारताची सलामीवीर शफाली वर्मा विरुद्ध पायचीतचे अपील केले असता अंपायरने बाद दिले होते मात्र तिने रिव्ह्यू घेत बॉल ट्रॅकिंगमध्ये ती नाबाद ठरली आणि सगळ्यांच्या जीवात जीव आला.

भारत २७-०

20:17 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: भारताचे सलामीवीर धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात दाखल

सलामीवीर यास्तिका भाटियाने अप्रतिम चौकार मारत चांगली सुरुवात केली. भारताला ती टिकवून ठेवणे गरजेचे आहे.

भारत ५-०

20:15 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: भारताला विजयासाठी पाकिस्ताने ठेवले १५० धावांचे लक्ष

पाकिस्तानने कर्णधार बिस्माह मारुफने शानदार अर्धशतक करत संघाला १४९ पर्यत नेऊन ठेवले. आता भारताला विजयासाठी १५० धावा करायच्या असून कशी सुरुवात करतो ते पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

पाकिस्तान १४९-४

20:03 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: भारताचे गचाळ क्षेत्ररक्षण सुरूच

एका बाजूला पाकिस्तान मोठे फटके मारत असताना आज भारतीय खेळाडूंनी गचाळ क्षेत्ररक्षण करत त्याच्या धावसंख्येत भर घातली असे म्हटले तर वावगं ठरणार नाही. आयशा नसीमचा झेल सोडत राधा यादव टीकेचा धनी होत आहे. पुढच्याच चेंडूवर हरलीनने झेल सोडला.

पाकिस्तान १४५-४

19:57 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: १६वे षटक भारताला पडले महागात

रेणुका ठाकूरने १६व्या षटकात १८ धावा कुटल्या. आयशा नसीम आणि बिस्माह मारूफ यांनी आधीच पाचव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली आहे. आयशा ३३ धावा आणि बिस्माह मारूफने ४५चेंडूत ५० धावा करून फलंदाजी करत आहे. त्याच षटकापासून मोमेंटम पाकिस्तानकडे शिफ्ट झाला.

पाकिस्तान १२९-४

19:52 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: कर्णधार बिस्माह मारुफचे शानदार अर्धशतक

कर्णधार बिस्माह मारुफने एक बाजू लावून धरत शानदार अर्धशतक झळकावले. ४५ चेंडूत ५० धावा करत खेळपट्टीवर टिकून आहे. तिला आयशा नसीम ३३ धावा करून साथ देत आहे.

पाकिस्तान १२०-४

19:44 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: पाकिस्तान गाठली शंभरी, भारताला विकेट्सची गरज

आयशा नसीम आणि कर्णधार मारुफ यांनी शेवटच्या काही षटकात शानदार फटकेबाजीला सुरुवात केली असून भारताला विकेट्सची गरज आहे. लवकरात लवकर विकेट्स काढल्या नाहीत तर ह्या धावा महागात पडू शकतात.

पाकिस्तान १०६-३

19:29 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: पाकिस्तानला चौथा धक्का,

पाकिस्तानला चौथा धक्का बसला असून सिद्रा अमीनला ११ धावांवर राधा यादवने रिचा घोषकरवी झेलबाद केले. एका बाजूने कर्णधार बिस्माह मारुफ तंबू ठोकून उभी आहे.

पाकिस्तान ६८-४

https://twitter.com/BCCIWomen/status/1624769326615261185?s=20&t=yMUjex1yp6M520X-M0WBsw

19:18 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: तीन विकेट्स लवकर पडल्यानंतर झाल्यानंतर पाकिस्तानने डाव सावरला

तीन विकेट्स लवकर पडल्यानंतर पाकिस्तानने डाव सावरला आहे. कर्णधार बिस्माह मारुफने एक बाजू लावून धरली असून एक-दोन धावा करत धावफलक हलता ठेवला आहे.

पाकिस्तान ५८-३

19:06 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: पाकिस्तानला तिसरा धक्का, निदा दार बाद

पाकिस्तानला तिसरा धक्का बसला असून भारताची वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकारने निदा दारला भोपळाही फोडू दिला नाही. एका बाजूला मारुफ अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे. भारताची यष्टीरक्षक रिचा घोषने शानदार रिव्ह्यू घेतला.

पाकिस्तान ४३-३

https://twitter.com/BCCIWomen/status/1624764060674957312?s=20&t=pk77ceLVxva5O8EwNK8zAw

19:00 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: जोडी फोडण्यात यश, पाकिस्तानला दुसरा धक्का

राधा यादवला धोकादायक जोडी फोडण्यात यश आले. तिने मुनीबा अलीला १२ धावांवर यष्टिचीत करत पाकिस्तानला दुसरा धक्का दिला.

पाकिस्तान ४२-२

https://twitter.com/BCCIWomen/status/1624762460204064774?s=20&t=3Cp1UEurGl4x7FbEUx82Rg

18:55 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: पहिल्या पॉवर प्ले मध्ये पाकिस्तानची सावध सुरुवात

पहिल्या पॉवर प्ले मध्ये पाकिस्तानची सावध सुरुवात झाली असून कर्णधार बिस्माह मारुफ आक्रमक फलंदाजी करताना दिसत आहे. मात्र मुनीबा मात्र संथ खेळताना दिसत आहे. त्यात भारताचे ढिसाळ क्षेत्ररक्षण, ओवर थ्रो यामुळे अधिक धावा देत आहे.

पाकिस्तान ३९-१

18:48 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: भारताची ढिसाळ क्षेत्ररक्षण, बिस्माह मारुफची आक्रमक सुरुवात

टीम इंडियाचे आजच्या सामन्यात ढिसाळ क्षेत्ररक्षण दिसत असून जेवढे कमी धावा देईल तेवढे चांगले आहे. कारण नंतर धावांचा पाठलाग करताना फारसे सोपे नसणार आहे. पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारुफने आक्रमक सुरुवात करत गोलंदाजांवर दबाव टाकत आहेत.

पाकिस्तान २४-१

18:39 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: पाकिस्तानला पहिला धक्का, जवेरिया खान बाद

सामन्याच्या दुसऱ्याच षटकात दीप्ती शर्माने जवेरिया खानला कर्णधार हरमनप्रीतकरवी झेलबाद केले. तिने केवळ ६ चेंडूत ८ धावा केल्या.

पाकिस्तान १०-१

https://twitter.com/BCCIWomen/status/1624757324966666243?s=20&t=3F6X84IHpPFUcGJKxi2GqA

18:31 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: पाकिस्तानचे सलामीवीर आले मैदानात

पाकिस्तानचे सलामीवीर मुनीबा अली आणि जवेरिया खान खेळपट्टीवर मैदानात आले आहेत. भारताकडून रेणुका ठाकूर गोलंदाजीला सुरुवात करणार आहे.

पाकिस्तान ०-०

18:27 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: राष्ट्रगीतासाठी मैदानात दाखल

भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघाचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात आले आहेत.

18:19 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: शफालीकडून सहकार्याची अपेक्षा आहे,

भारताची फलंदाजी हरमनप्रीतवर अवलंबून आहे. या दोघींना अंडर-१९ महिला टी२० विश्वचषक विजेती कर्णधार शफाली वर्माकडून चांगल्या पाठिंब्याची अपेक्षा असेल. जेमिमाह रॉड्रिग्जवर दडपण असेल कारण ती अलीकडच्या काळात चांगली कामगिरी करत नाहीये. त्याचबरोबर वेगवान गोलंदाजी अष्टपैलू पूजा वस्त्राकरची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. रिचा घोष ही अशी खेळाडू आहे जी डेथ ओव्हर्समध्ये संघासाठी झटपट धावा करू शकते.

18:14 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: "दुनिया जीत लो" असे म्हणत भारताची महिला स्टार मिताली राज ने शुभेच्छा दिल्या

"दुनिया जीत लो" असे म्हणत भारताची महिला स्टार मिताली राज ने शुभेच्छा दिल्या आहेत. मागील टी२० विश्वचषकात भारताकडून सर्वात चांगले प्रदर्शन तिने केले होते.

https://twitter.com/StarSportsIndia/status/1624649547485163521?s=20&t=R0l8Xswxa-PE9qn1I8Dsig

18:12 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: कशी असेल पाकिस्तानची प्लेईंग ११

पाकिस्तान पूर्ण ताकदीनिशी या सामन्यात उतरणार हे त्याच्या अंतिम अकरा खेळाडूंवरून दिसून येते.

18:09 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: कशी असेल भारताची प्लेईंग ११

भारताची धडाकेबाज सलामीवीर स्मृती मंधाना दुखापतग्रस्त असल्याने आजच्या सामन्यात खेळणार नाही.

18:04 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतली

पाकिस्तानची कर्णधार बिस्माह मारुफने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

https://twitter.com/BCCIWomen/status/1624750006254333953?s=20&t=WGASdwJ9egbYF3dIB0ld5A

17:53 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: टीम इंडिया विश्वचषकातील पहिला विजय नोंदवण्यासाठी उतरली मैदानात

भारतीय महिला क्रिकेट संघ आज कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे आपल्या मोहिमेला सुरुवात करेन. त्यासाठी सर्व संघ मैदानात पोहचला असून सराव करत आहे.

https://twitter.com/BCCIWomen/status/1624741686902652928?s=20&t=I-5SDmoSrjIs-PjAey6QaQ

17:20 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: न्यूलँड्स क्रिकेट मैदानातील खेळपट्टी काय रंग दाखवणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना न्यूलँड्स, केपटाऊन येथे होणार आहे. न्यूलँड्सची खेळपट्टी गोलंदाजांपेक्षा फलंदाजांना अधिक मदत करते. या खेळपट्टीवर झालेल्या शेवटच्या ५ महिला टी२० सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३ सामने जिंकले आहेत तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने २ सामने जिंकले असून ह्या ठिकाणी मोठी धावसंख्या जास्त होतात.

या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या १२९ धावांची आहे. गेल्या ५ सामन्यांमध्ये या खेळपट्टीवर दोनदा १५० किंवा त्याहून अधिक धावा झाल्या आहेत. महिला क्रिकेटच्या दृष्टीने ही चांगली धावसंख्या आहे. या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतर संघाला प्रथम गोलंदाजी करणे आवडते.

17:04 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने हरमन ब्रिगेडला दिल्या शुभेच्छा

महिला टी२० विश्वचषकाला १० तारखेपासून सुरुवात झाली असली तरी त्याआधीपासूनचं स्टार स्पोर्ट्सने महिला संघाला प्रेरणा देणारा व्हिडिओ तयार केला होता. तो व्हिडिओ भारताचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने ट्विटर शेअर करत हरमनप्रीतच्या संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.

INDW vs PAKW WC: ‘HISTORY’; HIS नव्हे ‘HER STORY’, हरमन ब्रिगेडला शुभेच्छा देणारा Video किंग कोहलीने केला शेअर

https://www.loksatta.com/krida/indw-vs-pakw-wc-not-history-but-his-her-story-video-shared-by-virat-kohli-wishing-harman-brigade-avw-92-3458607/

17:01 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: आजच्या सामन्याला स्मृती मंधाना मुकणार

या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. खरं तर, संघाची स्टार फलंदाज आणि उपकर्णधार स्मृती मानधना बोटाच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या पहिल्या सामन्यातून बाहेर पडली आहे.

https://twitter.com/ANI/status/1624387223897665540?t=ypSrWFhhBx82loQcyKaj5A&s=08

16:58 (IST) 12 Feb 2023
INDW vs PAKW: महिला टी२० विश्वचषकात आज भारतीय संघ करणार पाकिस्तानशी दोन हात

महिला टी२० विश्वचषक २०२३ चा तिसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. या सामन्याची सर्व क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही सराव सामन्यांमध्ये एक विजय आणि एक पराभवानंतर एकमेकांशी भिडतील.

https://twitter.com/StarSportsIndia/status/1624611940533420032?t=qaJ4Ac8wXHyIAoBNEKGWoA&s=08

India W vs Pakistan W T20 World Cup Highlights Update Score: भारत विरुद्ध पाकिस्तान महिला टी२० विश्वचषक सामना हायलाइट्स अपडेट्स

भारतीय संघाने रविवारी महिला टी२० विश्वचषकातील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होता. केपटाऊनमधील न्यूलँड्स येथे हा सामना खेळला गेला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून १४९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने १९ व्या षटकात तीन गडी गमावून लक्ष्य गाठले.