Shubman Gill LBW Video: भारतीय संघात असे काही युवा खेळाडू आहे, जे अनुभवी खेळाडूंच्या तोडीस तोड खेळण्याची क्षमता राखतात. या खेळाडूंमध्ये शुबमन गिल या हिऱ्याचा समावेश होतो. गिल सध्या भलत्याच फॉर्मात आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या अहमदाबाद कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शतक ठोकले आहे. मात्र शतकाआधी कांगारूंचा रडीचा डाव पाहायला मिळाला. पायचीतचे अपील करूनही शुबमन गिलला जीवदान मिळाले, यावरून ऑस्ट्रेलियन खेळाडू अंपायरशी भिडले.

शुबमन गिल एलबीडब्ल्यू व्हिडिओ: गिलच्या पायचीतवर वाद

भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिल चौथ्या कसोटीत चांगल्या लयीत फलंदाजी करताना दिसला. मात्र ३१ धावांवर असताना त्याला जीवदान मिळाले. सोप्या भाषेत सांगायचे तर त्याच्या नशिबाने त्याला खूप चांगली साथ दिली. नॅथन लियॉनच्या १७व्या षटकातील तिसरा चेंडू गिलच्या पायाला लागला आणि पायचीतचे अपील झाले मग त्यावर ऑस्ट्रेलियाने त्यावर डीआरएस घेतला. त्याचे झाले असे की, लायनने शुबमन गिलला पायचीत करण्याचा प्रयत्न केला पण त्या चेंडूला गिलने पुढे जाऊन बचाव केला. तो पूर्णपणे आधी पॅडला लागला होता पण चेंडू थेट पॅडवर आदळल्याने ऑसीनी अपील केले. यावर अंपायरने तिसऱ्या अंपायरकडे हा निर्णय सोपवला आणि त्यात शुबमन फटका खेळण्यासाठी तीन मीटर पुढे आल्याचे दिसले. त्यामुळे नियमानुसार त्याला नाबाद ठरवण्यात आले. त्यात चेंडू ऑफसाईड ऑफ होता त्यामुळे त्यांचा रिव्ह्यू देखील वाया गेला. मग स्टीव्ह स्मिथ कर्णधार आणि लायन यांनी अंपायरसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. अंपायर मात्र आपल्या निर्णयावर ठाम राहिले.

Green signal for Suryakumar Yadav to play in IPL
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता
ben stoke
बेन स्टोक्सची ट्वेन्टी-२० विश्वचषकातून माघार
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: चार दिवसांपूर्वी स्ट्रेचरवर, आज चेन्नईचा हिरो; मुस्ताफिझूर रहमानच्या गोलंदाजीवर आरसीबीने टेकले गुडघे
India Australia first Test match likely to be held in Perth sport news
भारत- ऑस्ट्रेलिया पहिली कसोटी पर्थला?

शुबमन गिलचे कसोटीतील दुसरे शतक

कर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी उतरलेला शुबमन गिल याने शानदार शतक साजरे केले. त्याने १९४ चेंडूचा सामना करत शतक साजरे केले. हे त्याचे कसोटीतील दुसरे शतक होते. २०२०-२१ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कसोटीत पदार्पण करणाऱ्या गिलने मागील वर्षी डिसेंबर महिन्यात बांगलादेशविरुद्ध आपले पहिले शतक झळकावले होते. तरीही, रोहितच्या पुनरागमनामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर व्हावे लागले. मात्र, राहुलच्या खराब फॉर्मामुळे त्याला खेळण्याची संधी मिळाली. तसेच, गिलने १ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. तो या कसोटीत रोहितनंतर शतक करणारा दुसरा भारतीय आहे. विशेष म्हणजे, त्याने एक खास कारनामा केला आहे.

हेही वाचा: LLC 2023: ”अब्दुल रझाकचा चेंडू गौतमच्या गंभीरच्या हेल्मेटवर आदळला अन्…; लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये आफ्रिदी-गंभीर पुन्हा आमने सामने, पाहा Video

शुबमनचा शानदार विक्रम

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या दोन्ही सामन्यात बाहेर बसल्यानंतर इंदोर कसोटीत लोकेश राहुलच्या जागी गिलला संघात संधी दिली होती. त्या सामन्यात तो लवकर बाद झाला होता. मात्र, त्याने अहमदाबादमध्ये शतक ठोकले आहे. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावताच गिलच्या नावावर एक खास विक्रमाची नोंद झाली. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा युवा सलामीवीर फलंदाज बनला. गिलने २३ वर्षे आणि १८२ दिवसातच ही कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक ठोकणाऱ्या युवा भारतीय सलामीवीरांच्या यादीत अव्वलस्थानी केएल राहुल आहे. राहुलने २२ वर्षे आणि २६३ दिवसांच्या वयात शतक ठोकले होते. तिसऱ्या स्थानी व्हीव्हीएस लक्ष्मण असून त्याने २५ वर्षे आणि ६२ दिवसांच्या वयात ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक केले होते.