थरारनाट्यच..! विजय मिळाला म्हणून टीम इंडियाच्या खेळाडूंनी केला जल्लोष, इतक्यातच पंचांनी…

ऑस्ट्रेलियाला शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावांची गरज होती. शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन फलंदाज झेलबाद झाली, पण..

indw vs ausw australia seal dramatic final over win
ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय सामन्यातील सलग २६ वा विजय

ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा ५ गडी राखून पराभव केला. या रोमांचक सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाला शेवटच्या षटकात विजयासाठी १३ धावा कराव्या लागल्या. शेवटच्या चेंडूवर केरी झेलबाद झाली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी विजयाचा आनंद साजरा करायला सुरुवात केली. पण थर्ड अंपायरने नो-बॉल दिला. ऑस्ट्रेलियाने शेवटच्या चेंडूवर २ धावा करत सामना जिंकला. यासह ऑस्ट्रेलियाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.

ऑस्ट्रेलियासाठी बेथ मुनीने नाबाद १२५ धावा करत सामना आपल्या बाजूने फिरवला. भारतीय संघाने प्रथम खेळताना ७ गडी बाद २७४ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाचा एकदिवसीय सामन्यातील हा सलग २६ वा विजय आहे. त्यांनी चार वर्षांपासून एकही सामना गमावलेला नाही.

लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली नाही. संघाने ५२ धावांत ४ गडी गमावले. यानंतर, बेथ मूनी आणि ताहलिया मॅकग्रा (७४) यांनी पाचव्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. मॅकग्राला ऑफस्पिनर दीप्ती शर्माने बाद केले. यानंतर, मूनी आणि निकोला केरी यांनी ९७ धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाला शेवटच्या ५ षटकांत ४६ धावा करायच्या होत्या.

हेही वाचा – क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! टीम इंडियाच्या टी-२० वर्ल्डकप विजयावर येतोय चित्रपट; नावाचीही झाली घोषणा

शेवटच्या षटकात रंगला थरार

मुनीने शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तीन धावा काढल्या. कॅरीने दुसऱ्या चेंडूवर २ धावा काढल्या. आता ४ चेंडूत ८ धावा करायच्या होत्या. तिसरा चेंडू नोबॉल होता. फुल टॉस बॉल केरीच्या हेल्मेटला लागला. आता ऑस्ट्रेलियाला शेवटच्या ४ चेंडूत ७ धावा करायच्या होत्या. तिसऱ्या चेंडूवर लेग बाय रन मिळाला. मुनीने चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. ही धाव देखील लेग बाय होती. केरीने पाचव्या चेंडूवर २ धावा काढल्या. सहावा चेंडू नो-बॉल होता. आता एका चेंडूमध्ये १ धावा करायच्या होत्या. मुनीने या २ धावा केल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indw vs ausw australia seal dramatic final over win adn

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी