INDW vs AUSW T20I Match Timing Details: भारतीय संघ वुमन्स प्रीमियर लीग २०२५ नंतर आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला आहे. दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका, एकदिवसीय मालिका आणि कसोटी सामनादेखील खेळवला जाणार आहे. टी-२० मालिकेने या मल्टी फॉरमॅट मालिकेला सुरूवात होणार आहे. हरमनप्रीत कौर या मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्त्व करणार आहे. तर ऑस्ट्रेलियाची कमान आता सॉफी मॉलिन्यूकडे असेल. याचबरोबर ऑस्ट्रेलियाची नियमित कर्णधार एलिसा हिलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीपूर्वी अखेरची मालिका असेल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील टी-२० मालिकेला उद्या म्हणजेच १५ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. टी-२० मालिकेनंतर एकदिवसीय मालिका होणार आहे, २४ फेब्रुवारीला ब्रिस्बेन येथे पहिल्या सामन्याने मालिकेला सुरूवात होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना २७ फेब्रुवारी रोजी होबार्ट येथे खेळवला जाईल, तर तिसरा एकदिवसीय सामना १ मार्च रोजी खेळवला जाईल.
महिला विश्वचषक उपांत्य फेरीनंतर हे दोन्ही संघ एकदिवसीय सामन्यात एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ असेल. ही मालिका ऑस्ट्रेलियाची महान फलंदाज एलिसा हिलीसाठी शेवटची मालिका असेल कारण तिने भारताविरुद्धच्या मालिकेनंतर सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे सामने कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार?
भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघांमधील टी-२० मालिकेला उद्या म्हणजेच १५ फेब्रुवारीपासून सुरूवात होत आहे. या तीन सामन्यांची टी-२० मालिकेतील तिन्ही सामने १५ फेब्रुवारी, १९ फेब्रुवारी आणि २१ फेब्रुवारी रोजी खेळवले जातील. या टी-२० मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १.४५ वाजता खेळवले जातील. तर अर्धा तास आधी म्हणजेच १.१५ वाजता नाणेफेक होईल. ही मालिका स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर तर जिओ हॉटस्टार अॅपवर लाईव्ह पाहता येणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकमेव कसोटी सामना ६ ते ९ मार्च दरम्यान पर्थ स्टेडियमवर खेळवला जाईल. या सामन्यानंतर भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा संपेल.
ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारत महिला हेड-टू-हेड
एकूण
सामने – ३५, ऑस्ट्रेलिया – २६, भारत – ७, बरोबरी – १, अनिर्णित – १
ऑस्ट्रेलियामधील संघांचा विक्रम
सामने – १२, ऑस्ट्रेलिया – ७, भारत – ४, बरोबरी – ०, अनिर्णित – १
भारत वि ऑस्ट्रेलिया महिला संघांच्या टी-२० मालिकेचं वेळापत्रक
रविवार, १५ फेब्रुवारी २०२६ – पहिला टी२० सामना – ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारत महिला, सिडनी
गुरुवार, १९ फेब्रुवारी २०२६ – दुसरा टी२० सामना – ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारत महिला,कॅनबेरा
शनिवार, २१ फेब्रुवारी २०२६ – तिसरा टी२० सामना – ऑस्ट्रेलिया महिला विरुद्ध भारत महिला, अॅडलेड
ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेसाठी भारताचा संघ
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्रीचरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (यष्टीरक्षक), जी कमलिनी (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिक पाटील, फुफ्फुस पाटील, जेमिमा रॉड्रीग्ज, भारती फुलमाली, श्रेयंका पाटील
