४,४,४,४,४..! इंग्लंडमध्ये भारताची ‘लेडी सेहवाग’ तळपली

जिने उडवला होता त्रिफळा, तिचाच घेतला खरपूस समाचार!

indw vs engw shafali verma hits five fours to katherine brunt in fourth over
शफालीकडून इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार

भारताची ‘लेडी सेहवाग’ म्हणून ओळखली जाणाऱ्या शफाली वर्माने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात फलंदाजी करताना धुमाकूळ घातला. सलामीवीर स्मृती मंधानासोबत फलंदाजीला आलेल्या शफालीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत दमदार फलंदाजी केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ७० धावांची भागीदारी रचली. विशेष म्हणजे, इंग्लंडची गोलंदाज कॅथरीन ब्रंटने टाकलेल्या चौथ्या षटकात शफालीने ५ चौकार ठोकत आपला इरादा स्पष्ट केला.

ब्रंटच्या या षटकात २१ धावा वसूल केल्या गेल्या. स्मृतीने ब्रंटच्या पहिल्या चेंडूवर एक धाव घेत शफालीला स्ट्राइक दिली. त्यानंतर शफालीने ब्रंटची बोलतीच बंद केली. तिने दुसर्‍या चेंडूवर मिडविकेटवर चौकार लगावला. पुढच्या चेंडूवर तिने गोलंदाजाच्या खांद्यावरुन चौकार मारला. तिसरा चौकार तिने बॅकवर्ड पॉईंटवर ठोकला. ओवर मिड ऑनला शफालीला चौथा चौकार मिळाला. षटकातील शेवटच्या चेंडूवर तिने मिडविकेटवर चौकार ठोकला.

 

हेही वाचा – आनंदाची बातमी..! मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज पुढच्या वर्षी होणार ‘बाप’

या सामन्यात शफाली वर्माने ३८ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. यात तिने ८ चौकार आणि एक षटकार ठोकला. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि भारताला फलंदाजीचे आव्हान दिले. भारताने २० षटकात ४ गडी गमवून इंग्लंडसमोर १४८ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडचा संघ या टी-२० मालिकेमध्ये आधीच १-० अशी आघाडी घेत आहे. यापूर्वी इंग्लंडने एकदिवसीय मालिका २-१ने जिंकली होती.

ब्रंटने शफालीचा उडवला होता त्रिफळा

इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात इंग्लंडने ७ गडी गमावून १७७ धावा केल्या होत्या. परंतु भारतीय संघाला या सामन्यात १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. पहिल्या सामन्यात शफालीला खातेही उघडता आले नव्हते. ब्रंटने शफालीचा त्रिफळा उद्ध्वस्त केला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indw vs engw shafali verma hits five fours to katherine brunt in fourth over adn

ताज्या बातम्या