आयची-नागोया आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू सुवर्णपदकाला गवसणी घालण्याच्या प्रयत्नात आहेत. सोमवारअखेर भारताच्या खात्यात एकूण ६ पदकं जमा झाली होती; मात्र त्यापैकी एकही सुवर्ण नव्हतं. आता भारतीय महिला क्रिकेट संघाकडे ही प्रतीक्षा संपवण्याची संधी आहे. आशिया चषकाच्या नुकत्याच झालेल्या अंतिम सामन्याची पुनरावृत्ती करत भारताचा सामना श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. त्याचबरोबर १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत पार्थ माने आणि इलावेनिल वलारिवन यांच्याकडूनही सुवर्णपदकाच्या अपेक्षा आहेत.
मंगळवार, २२ सप्टेंबर : भारताच्या महत्त्वाच्या लढती आणि पदकाच्या संधी
बॅडमिंटन | सकाळी ६:००: पी. व्ही. सिंधू, उन्नती हूडा, देविका सिहाग, तन्वी शर्मा, ईशाराणी बरुआ, ट्रीसा जॉली, गायत्री गोपीचंद, कविप्रिया, सिमरन आणि तनिषा यांचा भारतीय महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत जपानविरुद्ध खेळणार.
शूटिंग | सकाळी ६:१५: पार्थ माने आणि इलावेनिल वलारिवान १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत सहभागी.
वुशू: हंजाबम लांगलेंटोम्बी देवी महिलांच्या नानक्वान आणि नानदाओ प्रकारात मैदानात उतरणार.
शूटिंग | सकाळी ६:३०: अनंतजीत सिंग नरुका, मिराज अहमद खान आणि भवतेग सिंग गिल स्कीट पुरुषांच्या वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सहभागी.
शूटिंग | सकाळी ६:३०: परिनाझ धालीवाल, रायझा धिल्लों आणि महेश्वरी चौहान स्कीट महिलांच्या वैयक्तिक आणि सांघिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सहभागी.
टेबल टेनिस | सकाळी ६:३०: श्रीजा अकुला, यशस्विनी घोरपडे, दिया चितळे, सुतीर्था मुखर्जी आणि सिंद्रेला दास यांचा भारतीय महिला संघ स्पर्धेत सहभागी होणार.
फेन्सिंग | सकाळी ६:३०: सनासम हेमाश सिंग पुरुषांच्या फॉइल वैयक्तिक स्पर्धेत सहभागी.
कबड्डी | सकाळी ७:१५: भारतीय पुरुष संघाचा गटातील सामना दक्षिण कोरियाविरुद्ध.
शूटिंग | सकाळी ८:२५: पार्थ माने आणि इलावेनिल वलारिवान १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक स्पर्धेत पुन्हा मैदानात.
क्रिकेट | सकाळी १०:३०: भारतीय महिला संघाचा श्रीलंकेविरुद्ध अंतिम सामना.
Asian Games 2026 INDW vs SLW Final : आशियाई क्रीडा स्पर्धा भारत महिला आणि श्रीलंका महिला संघ फायनलचे लाईव्ह अपडेट्स
IND vs SL Hockey: भारताचा श्रीलंकेवर एकतर्फी विजय
भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये झालेल्या हॉकी सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर १६-१ ने विजय मिळवला आहे.
भारतीय संघाने या सामन्यात भक्कम सुरूवात केली आहे. भारतीय संघाने दुसऱ्या क्वार्टरअखेर ८-० ने आघाडी घेतली आहे.
Asian Games live: हॉकी सामन्याला सुरूवात
भारताच्या पुरूष हॉकी संघाचा श्रीलंकेविरूद्ध सामना सुरू झाला आहे. पहिल्याच हाफमध्ये भारताने ३ गोल केले आहेत.
Asian Games live: वुशूमध्ये भारताचं पदक निश्चित
भारताची अनुभवी वुशूपटू रोशिबिना देवीने आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे आणखी एक पदक निश्चित केलं आहे. २०१८च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेती आणि हांगझोऊ आशियाडमधील रौप्यपदक विजेती रोशिबिनाने महिला ६० किलो सांडा गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत मकाऊच्या चू मॅन सिनचा ५-० असा पराभव केला.
भारताच्या पुरूष बॅडमिंटन संघाने जपान संघाचा ३-० ने पराभव करत मोठा विजय मिळवला. यासह भारताचं बॅडमिंटनमध्ये पदक निश्चित झालं आहे. लक्ष्य सेन व सात्त्विक-चिरागच्या जोडीनंतर आयुष शेट्टीने वातानाबेचा सरळ दोन सेटमध्ये पराभव केला. यासह भारताने सलग ३ विजय मिळवत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. यासह टीम इंडियाचं अजून एक पदक निश्चित केलं आहे.
Asian Games live boxing: जादुमणी सिंगची विजयी सुरूवात
भारताचा जादुमणी सिंह मेंदेंगबामने पुरुषांच्या ५५ किलो वजनी गटातील बॉक्सिंग सामन्यात नेपाळच्या चंद्र बहादूर थापाविरुद्ध विजय मिळवला आहे.
Asian Games live Badminton updates: बॅडमिंटन
पुरूषांच्या बॅडमिंटन संघात तिसरा सामना आयुष शेट्टी व वातानाबे कोकी यांच्यात खेळवला जात आहे. पहिला सेट आयुषने सहज जिंकला असून दुसऱ्या सेटमध्ये तो आघाडीवर आहे.
बॅडमिंटनमधील दुसरा सामना सात्विकसाईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी यांचा ताकुरो होकी – युगो कोबायाशी यांच्यात सामना खेळला गेला. भारताच्या जोडीने सलग दोन सेटमध्ये सामना जिंकला. सात्त्विक-चिराने २१-१८ व २४-२२ अशा फरकाने विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघ या उपांत्यपूर्व फेरीत २-०ने आघाडीवर आहे.
Asian Games Badminton updates: बॅडमिंटन
बॅडमिंटनमध्ये भारताच्या पुरूष संघाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. लक्ष्य सेनने नाराओका कोडाईवर अखेरच्या सेटमध्ये रोमहर्षक विजय मिळवला. लक्ष्य सेनने पहिला सेट ११-२१ ने गमावला, तर दुसरा सेट २१-५ त्यानंतर तिसरा सेट २१-१९ ने जिंकत संघाला आघाडी मिळवून दिली.
गोल्डन गर्ल्स! भारताच्या महिला संघाने पटकावलं सुवर्णपदक! श्रीलंकेवर मिळवला टी-२० मधील सर्वात मोठा विजय
भारतीय महिला क्रिकेट संघाला सुवर्णपदक
भारतीय महिला क्रिकेट संघाने फायनलच्या मुकाबल्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवत सुवर्णपदकावर कब्जा केला.
INDW vs SLW Final live: श्रीलंकेने गमावली नववी विकेट
भारतीय संघ सुवर्णपदकाच्या पटकावण्याच्या उंबरठ्यावर आहे. कारण श्रीलंकेने नववी विकेट गमावली आहे.
INDW vs SLW Final live: दीप्ती शर्माच्या खात्यात दुसरी विकेट
दीप्ती शर्माने १०व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर कविशा दिल्हारीला बाद करत श्रीलंकेला सहावा धक्का दिला. श्रीलंकेला विजयासाठी १६८ धावांची गरज असून भारताला फक्त ४ विकेट्सची गरज आहे.
INDW v SLW Live: श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत
श्रीचरणीने ९व्या षटकातील चौथ्या चेंडूवर करूणारत्नेला झेलबाद करत भारताला पाचवी विकेट मिळवून दिली. यासह आता भारतीय संघ सुवर्णपदक मिळवण्यापासून एक पाऊल दूर आहे.
INDW vs SLW Final live: श्रेयंका पाटीलची प्रभावी फिरकी
आठव्या षटकात श्रेयंका पाटीलने हर्षिता समरविक्रमाला आपल्या गोलंदाजीवर झेलबाद केलं आणि हर्षिता खातंही न उघडता ती माघारी परतली.
INDW vs SLW Final live: भारताच्या खात्यात मोठी विकेट
भारताची सर्वात अनुभवी गोलंदाजी दीप्ती शर्माने सातव्या षटकातील पाचव्या चेंडूवर चमारी अट्टापटू मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झालीय अट्टापटू २९ धावा करत बाद झाली.
INDW vs SLW Final live: शफाली वर्माची कमाल गोलंदाजी
शफाली वर्माने तिसऱ्या षटकात भारताला ब्रेकथ्रू मिळवून दिला. शफालीच्या चेंडूवर इमेशा दुलानीला रिचाने स्टंपिग करत माघारी धाडलं. यानंतर पाचव्या षटकात शफालीने पहिल्याच चेंडूवर हसीनी परेराला झेलबाद करत दुसरी विकेट मिळवून दिली.
भारताने दिलेल्या २१८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानावर उतरला आहे. चमारी अट्टापटू इमेशा दुलानी फलंदाजीसाठी उतरल्या होत्या.
Asian Games live: बॅडमिंटन अपडेट
बॅडमिंटनमध्ये भारताच्या पुरूष क्रिकेट संघाची जपानविरूद्ध उपांत्यपूर्व फेरी सुरू झाली आहे. लक्ष्य सेन आणि नाराओका कोडाई यांच्यात सामना सुरू आहे. पहिला सेट नाराओका तर दुसरा सेट लक्ष्य सेनने जिंकला आहे. तर तिसऱ्या सेटच्या पहिल्या हाफमध्ये ११-६ असा नाराओका आघाडीवर आहे.
रिचा घोषच्या अखेरच्या षटकांतील वादळी फटेबाजीच्या बळावर भारताने धावांचा डोंगर उभारला आहे. यासह भारताने फायनलमध्ये २० षटकांत ४ बाद २१६ धावा केल्या आहेत. रिचा घोषने अखेरच्या षटकांमध्ये २२ चेंडूत ६ चौकार ३ षटकारांसह ४९ धावा करत मोठी कामगिरी केली. याशिवाय स्मृती मानधना व शफाली वर्मा यांनी भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचली.
INDW vs SLW Final live: भारत २०० धावांच्या पलीकडे
रिचा घोषने अखेरच्या षटकात दोन षटकार लगावत भारताला २०० अधिक धावांचा पल्ला गाठून दिला. यासह आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा भारत पहिला संघ ठरला.
INDW vs SLW Final live: रिचा घोषची वादळी फटकेबाजी
स्मृती मानधना बाद झाल्यानंतर रिचा घोषने संघाचा डाव सावरला असून २०० धावांचा पल्ला पार करण्यासाठी वादळी फटके खेळत आहे. रिचाने १८व्या षटकात १९ धावा कुटल्या आहेत.
INDW vs SLW Final live: स्मृती मानधना झेलबाद
भारतीय संघाला स्मृती मानधनाच्या रूपात १७व्या षटकात मोठा धक्का बसला. १७व्या षटकात सुगंधिका कुमारीच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाली. स्मृतीने ४५ चेंडूत ५ चौकार व ७ षटकारांसह ७९ धावांची खेळी केली. यासह १७ षटकांत भारताने ३ बाद १६३ धावा केल्या आहेत. सध्या मैदानावर रिचा घोष व भारती फुलमाळी मैदानावर आहेत.
Asian Games 2026: विजेत्या संघाला मोहसीन नक्वी मेडल देणार? भारत-श्रीलंका फायनलआधी समोर आली मोठी अपडेट
स्मृती मानधनाचा वर्ल्ड रेकॉर्ड! क्रिकेट इतिहासात आजवर कोणालाचं नाही जमलं, अशी कामगिरी करणारी जगातील पहिली फलंदाज
INDW vs SLW Final live: हरमनप्रीत कौर बाद
हरमनप्रीत कौर सलग दुसऱ्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाली आणि भारताला दुसरा धक्का बसला. यासह हरमन १९ धावा करत बाद झाली. तर स्मृती मानधना ७३ धावांवर खेळत असून ती शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे. तर भारतीय संघाने १५ षटकांत २ बाद १४२ धावा केल्या आहेत.
Smriti Mandhana fifty: स्मृती मानधनाचं अर्धशतक
स्मृती मानधनाने ३० चेंडूत ५ षटकार व ३ चौकारांसह वादळी अर्धशतकी खेळी साकारली. तर त्याच षटकात मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात शफाली वर्मा झेलबाद झाली. भारताने १० षटकांत भारताने १ बाद ९९ धावा केल्या आहेत.
INDW vs SLW Final live: पॉवरप्ले
स्मृती मानधना व शफाली वर्माने पॉवरप्लेचा पुरेपर वापर करत ६७ धावा केल्या आहेत. दोघीही चांगल्या फॉर्मात असून त्यांनी फायनलमध्ये संघाला चांगली सुरूवात करून दिली आहे. स्मृती मानधना ३८ धावा तर शफाली २९ धावांवर खेळत आहे.
शफाली वर्मा स्मृती मानधना यांनी पॉवरप्लेमध्ये वादळी फटकेबाजी केली आहे. यासह भारताने ५ षटकांपूर्वीच अर्धशतकाचा आकडा गाठला. यासह भारताने ५ षटकांत बिनबाद ५९ धावा केल्या आहेत. शफाली २३ तर स्मृती ३६ धावांवर खेळत आहे.
INDW vs SLW Final live: सामन्याला सुरूवात
भारत आणि श्रीलंका महिला क्रिकेट अंतिम सामन्याला सुरूवात झाली आहे. भारताकडून शफाली वर्मा व स्मृती मानधनाची जोडी मैदानावर उतरली आहे. स्मृतीने पहिल्या षटकात दोन चौकार लगावत सुरूवात केली.

जपानमधील आइची-नागोया येथे सुरू असलेल्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेचा आज तिसरा दिवस आहे आणि मंगळवार, २२ सप्टेंबर हा दिवस भारतासाठी खरोखरच शुभ ठरू शकतो. या स्पर्धेत भारताने आधीच पदकांचं खातं उघडलं असून, सुवर्णपदकाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. भारतीय पथकाला अद्याप सुवर्णपदक मिळालेलं नाही, परंतु आज ती कामगिरी साध्य होऊ शकते; कारण भारतीय महिला क्रिकेट संघ सुवर्णपदक जिंकण्याच्या उद्देशाने अंतिम सामन्यात मैदानात उतरणार आहे.
