Asia Cup 2018 : दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या आशिया चषकामधून बाहेर

दिपक चहरला संघात स्थान

हार्दिक पांड्या

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आशिया चषकामधून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. पाकिस्तानविरुद्ध सामन्यात झालेल्या पाठीच्या दुखापतीमुळे पांड्याला संघाबाहेर जावं लागणार आहे, पांड्याच्या जागी दिपक चहरची संघात निवड करण्यात आलेली आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला यासंदर्भात दुजोरा दिला आहे. पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करत असताना १८ व्या षटकात हार्दिक पांड्याच्या पाठीला दुखापत झाली होती, यानंतर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आलं होतं. त्यामुळे पांड्याच्या अनुपस्थितीचा टीम इंडियाला आगामी सामन्यांमध्ये फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

अवश्य वाचा – भारताची पाकिस्तानवर ८ गडी राखून मात, कर्णधार रोहित शर्माचं आक्रमक अर्धशतक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Injured pandya ruled out of asia cup