एपी, दोहा : प्रथमच उन्हाळय़ाऐवजी हिवाळय़ात आणि फुटबॉल हंगामाच्या मध्येच आयोजित करण्यात आलेल्या ‘फिफा’ विश्वचषक स्पर्धेपूर्वी व स्पर्धेदरम्यान खेळाडूंना दुखापती होण्याची भीती वर्तवण्यात येत होती. ही भीती दिवसागणिक खरी होताना दिसते आहे. विविध देशांच्या काही आघाडीच्या खेळाडूंना दुखापतींमुळे यंदाच्या विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. शुक्रवारी सेनेगल आणि अर्जेटिना या संघांनाही धक्के बसले आहेत.

सेनेगलचा तारांकित आघाडीपटू सादिओ माने रविवारपासून सुरू होणाऱ्या ‘फिफा’ विश्वचषकात खेळू शकणार नाही. माने याच्या उजव्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जर्मनीतील फुटबॉल क्लब बायर्न म्युनिककडून खेळताना ८ नोव्हेंबरला मानेच्या पायाला दुखापत झाली होती. मात्र, ‘फिफा’ विश्वचषकातील काही सामन्यांत तो सहभाग नोंदवेल अशी आशा असल्याने त्याचा सेनेगलच्या संघात समावेश करण्यात आला होता. परंतु त्याची दुखापत गंभीर असल्याने त्याच्यावर ऑस्ट्रिया येथे शस्त्रक्रिया करण्यात आली.

Thane Housing Court
ठाणे हाऊसिंग अदालतीत तक्रारदारांना दिलासा, प्रलंबित १२० पैकी ११० तक्रारींवर निर्णय
Kapil Dev Says Some people will suffer but no one is bigger than the country
Kapil Dev : “काही लोकांना त्रास होईल, परंतु देशापेक्षा कोणीही…”, कपिल देव यांनी बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयाचे केले स्वागत
Irfan Pathan raise question on BCCI about Hardik Pandya
Team India : ‘हे सर्वांना लागू होत नसेल, तर…’, इरफान पठाणकडून बीसीसीआयच्या केंद्रीय करारावर प्रश्न उपस्थित
team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया

आफ्रिकन चषक विजेत्या सेनेगलचा विश्वचषकासाठी यजमान कतार, नेदरलँड्स आणि इक्वेडोर यांच्यासह अ-गटात समावेश आहे. त्यांची सलामीची लढत सोमवारी नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. मानेची जगातील सर्वोत्तम आघाडीपटूंमध्ये गणना होते. त्यामुळे सेनेगलला त्याची नक्कीच उणीव भासेल.     

गोन्झालेस, कोरेया स्पर्धेबाहेर

अर्जेटिनाचे युवा आघाडीपटू निकोलास गोन्झालेस आणि ग्वाकिन कोरेया यांनाही दुखापतींमुळे ‘फिफा’ विश्वचषकाला मुकावे लागणार आहे. गुरुवारी सरावादरम्यान स्नायू दुखावल्यामुळे गोन्झालेसला स्पर्धेबाहेर व्हावे लागले. त्याच्या जागी अ‍ॅन्जेल कोरेयाचा अर्जेटिनाच्या संघात समावेश करण्यात आला. त्यापाठोपाठ ग्वाकीन कोरेयाही जायबंदी झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी थिआगो अल्माडाची निवड करण्यात आली. बुधवारी विश्वचषकापूर्वीच्या अखेरच्या सराव सामन्यात अर्जेटिनाने संयुक्त अरब अमिरातीवर ५-० असा विजय मिळवला होता. या सामन्यात ग्वाकीन कोरेयाने गोल केला होता.

दुखापतींमुळे विश्वचषकाला मुकणारे नामांकित खेळाडू एन्गोल कान्टे, पॉल पोग्बा आणि प्रेसनेल किम्पेम्बे (तिघेही फ्रान्स), टिमो वेर्नर आणि मार्को रॉइस (दोघेही जर्मनी), रीस जेम्स आणि बेन चिलवेल (दोघेही इंग्लंड), दिओगो जोटा आणि प्रेडो नेटो (पोर्तुगाल), आर्थर मेलो (ब्राझील), जिनी वाइनआल्डम (नेदरलँड्स), जिओवानी लो सेल्सो (अर्जेटिना), युटा नाकायामा (जपान)