मियामी : तारांकित खेळाडू लिओनेल मेसीच्या दोन गोलच्या जोरावर इंटर मियामीने मेजर लीग सॉकर सामन्यात डीसी युनायटेड संघावर ४-० असा विजय मिळवला. अर्जेंटिनाकडून नुकताच मेसी हा निरोपाचा सामना खेळला.
लुईस सुआरेझने दोन गोल करीत संघाच्या विजयात हातभार लावला. जर्मम बर्तेरामेने दोन गोल करण्यास सहाय्य केले. या कामगिरीमुळे इंटर मियामी संघ पुन्हा विजयपथावर आला आहे. अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाकडून आपल्या निरोपाच्या सामन्याच्या चार दिवसांनंतर झालेल्या या लढतीत मेसी संपूर्ण वेळे मैदानावर होता. आता त्याचे स्पर्धेच्या सध्या सुरू असलेल्या हंगामात २३ गोल झाले आहेत. हे कोणत्याही खेळाडूचे सर्वाधिक गोल आहेत.
सामन्याच्या सुरुवातीपासूनच इंटर मियामीने आक्रमक खेळ केला. तिसर्या मिनिटाला सुआरेझने गोल करीत संघाला आघाडीवर नेले. आणखी एका गोलची भर घालत संघाला मध्यंतरापर्यंत २-० असे आघाडीवर पोहोचवले. दुसर्या सत्रात मेसीने ४७व्या आणि ६०व्या मिनिटाला गोल झळकावत संघाला ४-० अशा मजबूत स्थितीत नेले. संघाने अखेरपर्यंत ही आघाडी कायम राखत विजय साकारला.
