scorecardresearch

इटालियन चषक फुटबॉल : इंटर मिलानला जेतेपद

अतिरिक्त वेळेत इंटरने आपला खेळ उंचावत दोन गोलची नोंद केली आणि सामना जिंकला.

रोम : अतिरिक्त वेळेत इव्हान पेरेसिचने केलेल्या दोल गोलच्या बळावर इंटर मिलानने अंतिम सामन्यात युव्हेंटसला ४-२ अशा फरकाने नमवत इटालियन चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद मिळवले.

या सामन्यात नियमित (९० मिनिटे) वेळेअंती दोन्ही संघांमध्ये २-२ अशी बरोबरी होती. त्यानंतर झालेल्या ३० मिनिटांच्या अतिरिक्त वेळेत इंटरच्या संघाने वर्चस्वपूर्ण खेळ केला. पेरिसिचने ९९व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे गोल करत इंटरला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानेच मग १०२व्या मिनिटाला आणखी एका गोलची भर घातल्याने इंटरने सामना ४-२ असा जिंकला. त्यापूर्वी, सहाव्या मिनिटाला निकोलो बारेलाने गोल करत इंटरला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात युव्हेंटसने आक्रमक खेळ केला. अ‍ॅलेक्स सँड्रो (५०वे मि.) आणि डूसान व्लाहोव्हिच (५२वे मि.) यांनी गोल करत युव्हेंटसला २-१ आघाडी मिळवून दिली. मात्र, ८०व्या मिनिटाला हकान चालोनोग्लूने गोल करत इंटरला २-२ अशी बरोबरी करून दिली. मग अतिरिक्त वेळेत इंटरने आपला खेळ उंचावत दोन गोलची नोंद केली आणि सामना जिंकला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Inter milan beat juventus in italian cup final zws

ताज्या बातम्या