सध्या यूएईमध्ये आंतरराष्ट्रीय लीग टी-२० लीग खेळली जात आहे. शुक्रवारी स्पर्धेतील २६ वा सामना एमआय एमिरेट्स विरुद्ध अबू धाबी नाइट रायडर्स यांच्यात झाला. या सामन्यादरम्यान पोलार्डचा सामना आंद्रे रसेलशी झाला, तेव्हा त्याने एकाच षटकात देशबांधव गोलंदाजाचे जोरदार धुलाई केली. त्याने रसेलच्या एकाच षटकांत २६ कुटताना चाहत्यांचे मनोरंजन केले.

पोलार्डने रसेलच्या एका षटकात चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना कुटल्या. या षटकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या सामन्यात किरॉन पोलार्डच्या एमआय एमिरेट्सने अबू धाबी नाइट रायडर्सवर १८ धावांनी विजय मिळवला. त्याचबरोबर प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले. डेझर्ट वायपर्स आणि गल्फ जायंट्सने यापूर्वी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल
IPL 2024 DC vs LSG Match Updates in Marathi
IPL 2024 LSG vs DC : जेक फ्रेझर मॅकगर्कच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीचा लखनऊवर ६ विकेट्सनी दणदणीत विजय
IPL 2024 Delhi Capitals vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024 DC vs CSK: धोनीच्या सुसाट खेळीने बायको साक्षीही भारावली, सामना हरल्याचं गेली विसरून…

पोलार्डच्या संघाने १७ षटकांनंतर ३ बाद १३१ धावा असताना, सुनील नरेनने आंद्रे रसेला चेंडू दिला. त्यावेळी संघ १६० धावांपर्यंत पोहोचू शकेल असे वाटत होते, मात्र १८व्या षटकात पोलार्डने जबरदस्त धुलाई केली. रसेलच्या पहिल्याच चेंडूवर तो नशीबवान ठरला आणि चेंडू सीमापार गेला. यानंतर त्याने पुल शॉटच्या मदतीने चार धावा केल्या. तिसऱ्या चेंडूवर पोलार्डला दोन धावा मिळाल्या.

किरॉन पोलार्डच्या फटकोबाजीचा व्हिडिओ

पहिल्या तीन चेंडूंमध्ये १० धावा खर्च केल्यानंतर, रसेलला चेंडू मिश्रण करायचे होते. पोलार्डला ते चांगलेच ठाऊक होते. रसेलने धिम्या गतीने चेंडू टाकला आणि पोलार्डने आणखी एक पुल शॉट मारला, यावेळी त्याने ६ धावा केल्या. पाचव्या चेंडूवर पोलार्ड पुन्हा भाग्यवान ठरला आणि त्याने थर्ड मॅनच्या दिशेने आणखी चौकार लगावला. निराश होऊन रसेल शेवटचा चेंडू यॉर्कर टाकायला गेला, पण तो चुकला. पोलार्डला तो चेंडूवर फुलटॉस मिळाली त्यावर आणि लाँग-ऑनवर आणखी एक षटकार मारला.

हेही वाचा – SA20: जॉन्टी ऱ्होड्सच्या ‘त्या’ कृत्तीने जिंकली चाहत्यांची मनं, VIDEO होतोय व्हायरल

या सामन्यात पोलार्डने १७ चेंडूत ४३ धावांची तुफानी खेळी करत सामन्याची दिशा बदलली. त्याच्या या खेळीच्या जोरावर पोलार्डला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. एमआयने प्रथम फलंदाजी करताना नाइट रायडर्ससमोर १८१ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावसंख्येसमोर अबुधाबीचा संपूर्ण संघ १६२ धावांवर गडगडला.