आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स  स्पर्धा : हिमा ऑलिम्पिक स्पर्धेला मुकणार?

रविवारी होणाऱ्या २०० मीटर शर्यतीत आणि २९ तारखेला होणाऱ्या महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीतही ती सहभागी होऊ शकणार नाही.

पतियाळा : राष्ट्रीय आंतरराज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या चौथ्या दिवशी सकाळच्या सत्रात हिमा दास दुखापतीमुळे १०० मीटरची प्राथमिक शर्यत पूर्ण करू शकली नाही. त्यामुळे ती ऑलिम्पिकला मुकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

रविवारी होणाऱ्या २०० मीटर शर्यतीत आणि २९ तारखेला होणाऱ्या महिलांच्या ४ बाय १०० मीटर रिले शर्यतीतही ती सहभागी होऊ शकणार नाही.

स्पर्धेच्या १०० मीटर शर्यतीत तमिळनाडूच्या एस. धनलक्ष्मीने सुवर्णपदक पटकावले, राष्ट्रीय विक्रमवीर द्युती चंदला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Interstate athletics competition hima das olympics akp

ताज्या बातम्या