संयुक्त अरब अमिरातीमध्ये १६ ते ३० एप्रिलदरम्यान झालेल्या इंडियन प्रीमियर लीग स्पध्रेच्या पहिल्या टप्प्याचा आढावा शनिवारी होणाऱ्या आयपीएल प्रशासकीय समितीच्या बैठकीत घेण्यात येणार आहे.
‘‘आयपीएलच्या पहिल्या टप्प्याचा आढावा आणि अन्य अनेक विषयांवर या बैठकीत चर्चा होईल,’’ अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय)सचिव संजय पटेल यांनी दिली. २८ मे रोजी होणारा बाद फेरीचा दुसरा सामना (एलिमिनिटेर) हा चेन्नईहून क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (सीसीआय) ब्रेबॉर्न स्टेडियमवर हलवण्यात येण्याची चिन्हे आहेत. यासंदर्भात बैठकीत चर्चा होईल. आयपीएलच्या कार्यक्रमानुसार बाद फेरीचा पहिला सामना (क्वालिफायर-१) २७ मे रोजी होणार आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दुसरा बाद फेरीचा सामना होणार आहे.