भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) यंदाच्या इंडियन प्रिमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यंदा ही स्पर्धा ४७ दिवसांची असेल. राज्यातील दुष्काळामुळे गेल्या वर्षी आयोजनाची संधी गमावलेल्या मुंबई आणि पुण्यात यंदा इंडियन प्रीमिअर लीगची जत्रा भरणार आहे. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात प्रत्येकी सात लढती होणार आहेत. सातव्या हंगामाचा तपशीलवार कार्यक्रम बुधवारी जाहीर करण्यात आला. यानुसार ५ एप्रिलला सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील हैदराबाद येथील लढतीने हंगामाची सलामी होणार आहे. हैदराबादमध्येच २१ मे रोजी अंतिम मुकाबला रंगेल.

एकूण १४ संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून दहा वेगवेगळ्या मैदानावर सामने खेळवण्यात येतील. प्रत्येक संघाची अन्य संघांशी एक लढत घरच्या मैदानावर तर दुसरी प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर होईल. मुंबई, पुण्यासह बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली, इंदूर, कानपूर, कोलकाता, मोहाली, राजकोट येथे स्पर्धेच्या लढती होतील. २०११ नंतर इंदूरला आयपीएल सामन्यांच्या आयोजनाची संधी मिळणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या तीन लढतींसाठी इंदूर घरचे मैदान असणार आहे. क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामन्यांसाठी ठिकाणाची घोषणा नंतर करण्यात येणार आहे. येत्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव २० फेब्रुवारीला होणार आहे. सात खेळाडूंना दोन कोटी रुपयांची पायाभूत किंमत मिळाली आहे. ३५१ खेळाडू लिलावासाठी उपलब्ध असतील. यात संलग्न देशांचे सहा खेळाडू आहेत. इंग्लंडचा बेन स्टोक्स, ईऑन मॉर्गन, इशांत शर्मा यांच्यावर संघांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Rohit Sharma statement regarding the World Cup 2027 sport news
पुढील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास उत्सुक! इतक्यातच निवृत्तीचा विचार नाही; रोहितचे वक्तव्य
national boxing championship marathi news
नागपूरच्या समीक्षा, अनंतने जिंकले राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक
Champions League T20 to resume
Champions League T20 : १० वर्षांनंतर चॅम्पियन्स टी-२० लीग खेळवली जाणार? भारतासह ‘या’ तीन देशांनी दाखवले स्वारस्य
IPL 2024 KKR vs RR and GT vs DC Games rescheduled
IPL 2024: आयपीएलच्या वेळापत्रकात दोन बदल, कोणत्या सामन्यांच्या तारखेत अदलाबदली; जाणून घ्या

५ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (हैदराबाद, रात्री ८ वाजता)
६ एप्रिल – रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. मुंबई इंडियन्स (पुणे, रात्री ८ वाजता)
७ एप्रिल – गुजरात लायन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (राजकोट, रात्री ८ वाजता)
८ एप्रिल – किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (इंदूर, दुपारी ४ वाजता)
८ एप्रिल – रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (बंगळुरु, रात्री ८ वाजता)
९ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. गुजरात लायन्स (हैदराबाद, दुपारी ४ वाजता)
९ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (मुंबई, रात्री ८ वाजता)
१० एप्रिल – किंग्ज इलेव्हन पंजाब वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (इंदूर, रात्री ८ वाजता)
११ एप्रिल – रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (पुणे, रात्री ८ वाजता)
१२ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद (मुंबई, रात्री ८ वाजता)
१३ एप्रिल – कोलकाता नाईटरायडर्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (कोलकाता, रात्री ८ वाजता)
१४ एप्रिल – रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. मुंबई इंडियन्स (बंगळुरु, दुपारी ४ वाजता)
१४ एप्रिल – गुजरात लायन्स वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (राजकोट, रात्री ८ वाजता)
१५ एप्रिल – कोलकाता नाईटरायडर्स वि. सनरायझर्स हैदराबाद (कोलकाता, दुपारी ४ वाजता)
१५ एप्रिल – दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (दिल्ली, रात्री ८ वाजता)
१६ एप्रिल – मुंबई इंडियन्स वि. गुजरात लायन्स (मुंबई, दुपारी ४ वाजता)
१६ एप्रिल – रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर वि. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (बंगळुरु, रात्री ८ वाजता)
१७ एप्रिल – दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. कोलकाता नाईटरायडर्स (दिल्ली, दुपारी ४ वाजता)
१७ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (हैदराबाद, रात्री ८ वाजता)
१८ एप्रिल – गुजरात लायन्स वि. रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर (राजकोट, रात्री ८ वाजता)
१८ एप्रिल – सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स (हैदराबाद, रात्री ८ वाजता)
२० एप्रिल – किंग्ज इलेव्हन पंजाब वि. मुंबई इंडियन्स (इंदूर, रात्री ८ वाजता)
२१ एप्रिल – कोलकाता नाईटरायडर्स वि. गुजरात लायन्स (कोलकाता, रात्री ८ वाजता)
२२ एप्रिल – दिल्ली डेअरडेव्हिल्स वि. मुंबई इंडियन्स (दिल्ली, दुपारी ४ वाजता)
२२ एप्रिल – रायझिंग पुणे सुपरजायंट्स वि. सनरायझर्स हैदराबाद (पुणे, रात्री ८ वाजता)
२३ एप्रिल – गुजरात लायन्स वि. किंग्ज इलेव्हन पंजाब (राजकोट, दुपारी ४ वाजता)