IPL 2019 : ‘हाच संघ स्पर्धा जिंकणार’; शेन वॉर्नची भविष्यवाणी

IPL 2019 ही स्पर्धा २३ मार्चपासून

IPL 2019 ही स्पर्धा २३ मार्चपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेला केवळ काहीच दिवस शिल्लक असल्यामुळे आता IPL फिव्हर जोर धरू लागला आहे. आयपीएलचा हा हंगाम सुरु होण्याआधीच राजस्थान रॉयल्सचा माजी कर्णधार शेन वॉर्न याने दोन मोठे आंदाज वर्तवले आहेत. त्याने इन्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्याने IPL 2019 स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार कोण? आणि या स्पर्धेचा मालिकावीर कोण ठरेल? असे दोन अंदाज व्यक्त केलेत आहेत.

त्याने आपल्या इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये राजस्थानच्या संघाला पाठिंबा दिला आहे. हा संघ विजयाचा प्रबळ दावेदार असल्याचे त्याने म्हटले आहे. तसेच संजू सॅमसन हाच या IPL 2019 हंगामातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही पटकावेल असे म्हटले आहे.

‘मुंबईला परत येऊन आणि राजस्थान संघाचा ब्रँड अँबेसेडर म्हणून गुलाबी जर्सी घालून चांगले वाटत आहे. IPL 2019 च्या पहिल्या सामन्यासाठी आता फक्त दोन आठवडे राहिले आहेत, त्यामुळे उत्सुकता आहे. हे खेळाडू सांघिक कामगिरी नक्कीच चांगली करतील आणि आम्ही यावर्षी विजेतेपदाची प्रबळ दावेदार असू. तसेच मला वाटते की संजू सॅमसन या स्पर्धेतील सर्वात्तम खेळाडू ठरेल.’ असे त्याने पोस्टमध्ये लिहीले आहे.

दरम्यान त्याने क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील मालिकावीराचा ‘किताब कोण पटकावेल? याबद्दलही अंदाज व्यक्तव्य केला आहे. जेव्हा तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळता, तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमुळे दुखी होणं तुम्ही स्वतःहून टाळता. तुम्ही पुनरागमन करताना केवळ नेटमध्ये जाऊन आपल्या सहकाऱ्यांबरोबर सराव कधी सुरु करतो याकडे लक्ष देता. त्यामुळे स्मिथ आणि वॉर्नर हे दोघे दमदार पुनरागमन करतील, असा मला विश्वास आहे. आणि डेव्हिड वॉर्नर हाच यंदाच्या विश्वचषकाचा मालिकावीर ठरेल, असे वॉर्न म्हणाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Ipl 2019 shane warne predicts rajasthan royals favourites ipl title sanju samson best player