IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी रायन हॅरिसची नियुक्ती

तेराव्या हंगामासाठी संघाला करणार मार्गदर्शन

१९ सप्टेंबरपासून युएईत रंगणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षण वर्गात आणखी एका अनुभवी माजी खेळाडूला संधी देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी जलदगती गोलंदाज रायन हॅरिसची दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि माजी ऑस्ट्रेलियन गोलंदाज जेम्स होप्स यंदाच्या हंगामात खासगी कारणामुळे सहभागी होणार नाहीये. त्याच्या जागेवर दिल्ली संघ व्यवस्थापनाने रायन हॅरिसची नियुक्ती केली आहे.

“आयपीएलमध्ये एका प्रकारे मी पुनरागमन करतोय, याचा मला आनंद आहे. दिल्लीसारखा संघ जो स्पर्धा जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जातो त्या संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करायला मला नक्की आवडेल. दिल्लीच्या संघात खूप चांगले गोलंदाज आहेत. त्यांच्यासोबत सराव करण्यासाठी आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मी उत्सुक आहे.” हॅरिसने दिल्लीच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२० बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2020 delhi capitals appoint ryan harris as new bowling coach psd

ताज्या बातम्या