IPL 2021 Auction: ठरलं!! ‘या’ तारखेला होणार खेळाडूंचा लिलाव

IPL व्यवस्थापनाने जाहीर केली अधिकृत तारीख

भारतात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे BCCIने आयपीएलच्या तेराव्या हंगामाचे आयोजन युएईमध्ये केले होते. या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलं. तो हंगाम संपुष्टात आल्यानंतर BCCIने लगेच पुढच्या हंगामाची तयारी सुरू केली होती. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात IPL 2021साठी खेळाडूंचा लिलाव होणार हे सांगण्यात आलं होते. अखेर आज IPL गव्हर्निंग कौन्सिलने लिलावाची तारीखदेखील जाहीर केली.

फेब्रुवारीच्या १८ तारखेला ही लिलाव प्रक्रिया पार पडणार असल्याची घोषणा IPLने अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून केली. यंदाच्या IPL लिलावाआधी प्रत्येक संघाला आपल्या संघातील कायम राखलेल्या खेळाडूंची यादी आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी BCCIकडे सुपूर्द करायची होती. त्यानुसार २० जानेवारीपर्यंत सर्व संघांनी आपल्या संघातून करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी BCCIला दिली. आता १८ तारखेला होणाऱ्या लिलावात सर्व संघ आपल्याला हवा असलेला खेळाडू घेण्यासाठी उत्सुक आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by IPL (@iplt20)

जे भारतीय खेळाडू करारमुक्त झाले आहेत आणि ज्यांना पुढील हंगामात IPLमध्ये सहभागी व्हायचं आहे अशा खेळाडूंनी ४ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजेपर्यंत आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरायचा आहे. मूळ फॉर्म आणि इतर आवश्यक कागदपत्रे १२ फेब्रुवारीपर्यंत पोस्टाने पाठवली तरीही चालणार आहे, अशी माहिती एएनआयने दिली आहे.

IPL 2021चे अधिकृत वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. परंतु सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदाचा हंगाम ११ एप्रिल ते ६ जून या कालावधीत रंगण्याची शक्यता आहे. लिलाव पार पडल्यानंतर IPLच्या यंदाच्या हंगामाचे वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2021 auction its official auction will be held on 18 february at chennai ipl governing council bcci vjb