CSK Vs KKR Final: कॅमेऱ्याच्या केबलनं दिलं शुबमन गिलला जीवदान; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

शुभमन गिलने उंच ठोकलेला चेंडू स्पाइडर कॅमच्या केबलला लागला. त्यामुळे हा चेंडू डेड घोषित करण्यात आला.

Shubhaman_Gill
CSK Vs KKR Final: कॅमेऱ्याच्या केबलनं दिलं शुबमन गिलला जीवदान; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस (Photo- iplt20.com)

कोलकाता आणि चेन्नई संघादरम्यान रंगलेल्या अंतिम सामन्यात चेन्नईने विजयासाठी १९३ धावांचं आव्हान दिलं होतं. कोलकात्याच्या शुभमन गिल आणि वेंकटेश अय्यर यांनी संघाला चांगली सुरुवात केली. सुरुवातीला धोनी आणि शार्दुल ठाकुर यांनी सोपे झेल सोडल्याने त्यांच्या फलंदाजीला आणखीनच धार चढली. दोघांनी पहिल्या गड्यासाठी ९१ धावांची भागीदारी केली.

गडी बाद होत नसल्याने चेन्नई गोलंदाज हतबल झाले होते. अखेर धोनीने संघाचं दहावं षटक रवींद्र जडेजाच्या हाती सोपवलं. या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर शुभमन गिलनं उंच फटका मारला. हा झेल अंबाती रायडू पकडला. त्यानंतर शुभमन बाद झाल्याने तंबूच्या दिशेने जाऊ लागला. मात्र पंचांनी त्याला थांबवलं. यामुळे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी पंचाशी बातचीत केली. नेमका काय प्रकार झाला? असं मैदानात उपस्थित असलेले प्रेक्षक आणि टीव्ही पाहणाऱ्या क्रीडाप्रेमींना कळला नाही. अखेर तो चेंडू डेड असल्याचं घोषित करण्यात आले. शुभमन गिलने उंच ठोकलेला चेंडू स्पाइडर कॅमच्या केबलला लागला. त्यामुळे हा चेंडू डेड घोषित करण्यात आला.

शुभमन गिलला नाबाद दिल्यानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे. नेटकऱ्यांनी मजेशीर मीम्स शेअर केले आहेत. चेन्नईच्या फॅन्सने कमेंट्समध्ये तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शुभमन गिलला बाद झाला असता तर त्याची खेळी २७ धावांवर संपली असती. मात्र त्याला मिळालेल्या जीवदानाचा त्याने फायदा घेतला आणि अर्धशतक झळकावलं. शुभमन गिलनं ४३ चेंडूत ५१ धावांची खेळी केली. यात ६ चौकारांचा समावेश आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2021 ball hit the spider cam ropes was declared dead and shubhman gill survives rmt

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या