चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या बलाढ्य संघात आज आयपीएल २०२१चा ५०वा सामना रंगत आहे. चेन्नई आणि दिल्ली हे संघ गुणतालिकेत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. आजच्या सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या प्लेईंग इलेव्हमध्ये बदल केले आहेत. दिल्लीचा कप्तान ऋषभ पंतने स्टीव्ह स्मिथला बसवून पदार्पणवीर रिपाल पटेलला संधी दिली, पण चेन्नईच्या संघात एक मोठा बदल झाला आहे.

चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंह धोनीने आपला जुना सहकारी रॉबिन उथप्पाला आजच्या सामन्यात संधी दिली आहे. दुखापतीमुळे धोनीने दिग्गज खेळाडू सुरेश रैनाला संघाबाहेर बसवले आहे. तर गोलंदाज केएम आसिफच्या ऐवजी दीपक चहरला पुन्हा संघात आणले आहे.

हेही वाचा – युवराज सिंगकडून भारताच्या ‘भावी’ कर्णधाराला वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाला…!

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंह धोनी (कप्तान आणि यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, फाफ डु प्लेसिस, मोईन अली, रॉबिन उथप्पा, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, जोश हेझलवूड.

दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत (कप्तान आणि यष्टीरक्षक), पृथ्वी शॉ, शिखर धवन, रिपाल पटेल, श्रेयस अय्यर, शिमरॉन हेटमायर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, कगिसो रबाडा, आवेश खान, एनरिक नॉर्किय़ा.