आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या पर्वामध्ये चेन्नईचा संघ गुणतालिकेमध्ये अव्वल स्थानी असतानाच महेंद्र सिंग धोनीच्या संघातून खेळणारा एक खेळाडू निवृत्ती घेणार असल्याची माहिती समोर आलीय. सीएसकेमधून खेळणारा अष्टपैलू खेळाडू मोईन अलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीय. तो आता इंग्लंडकडून रेड बॉल क्रिकेट म्हणजेच कसोटी सामने खेळणार नाही. लवकरच तो यासंदर्भातील अधिकृत घोषणा करणार आहे. मोईनने आपल्या या निर्णयाबद्दल इंग्लंड संघाचा कर्णधार जो रुट, प्रशिक्षक क्रिस सिल्वरवूड आणि निवड समितीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिलीय. मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यासाठी मोईनने हा निर्णय घेतला आहे. ३४ वर्षीय मोईनने इंग्लंडसाठी ६४ कसोटी सामने खेळले आहेत.

नक्की वाचा >> IPL 2021 Playoffs: …तर मुंबई इंडियन्स स्पर्धेतून पडणार बाहेर; CSK, RCB च्या चाहत्यांसाठी मात्र…

…म्हणून जाहीर केला निर्णय
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार मोईन हा पुढील महिन्यात होणाऱ्या टी २० विश्वचषक स्पर्धा आणि अ‍ॅशेस मालिकेमध्ये खेळणाऱ्या इंग्लंडच्या संघामधील संभावित सदस्यांमध्ये आहे. या दोन्ही मालिकांमध्ये खेळण्यासाठी मोईनला घरापासून फार काळ दूर रहावं लागलं असतं. मात्र यासंदर्भात मोईन हा संदिग्धावस्थेत होता. म्हणूनच त्याने कसोटीमधून निवृत्तीची घोषणा केलीय. त्यामुळे आता अ‍ॅशेससाठी त्याचा विचार केला जाणार नाही. अर्थात मोईन मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करण्यास इच्छूक आहे. तसेच तो काउंटी आणि इतर फ्रेंचायझींसाठी क्रिकेट खेळत राहणार आहे. तो प्रथम श्रेणीमधील क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे की नाही याबद्दल त्याने अद्याप आपला निर्णय जाहीर केलेला नाही.

अव्वल तीनपैकी एक…
कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून खेळताना मोईनने चांगली कामगिरी केलीय. त्याने इंग्लंडचा माजी अष्टपैलू खेळाडू असणाऱ्या इयान बॉथम, पाकिस्तानचा इमरान खान आणि वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्सपेक्षा कमी सामन्यांमध्ये दोन हजार धावा आणि १०० बळी मिळवण्याची कामगिरी केलीय. ६४ कसोटी सामन्यांमध्ये त्याने १९५ बळी घेतलेत. तो इंग्लंडसाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये १६ व्या स्थानी आहे. आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये तो जगातील सर्वोत्तम तीन अष्टपैलू खेळाडूंपैकी एक ठरला होता.

नक्की वाचा >> ‘या’ वरिष्ठ खेळाडूने तक्रार केल्याने गेलं कर्णधारपद? BCCI कडे विराटच्या Attitude बद्दल केलेली तक्रार

फलंदाजीमध्येही भन्नाट कामगिरी
गोलंदाजीबरोबरच कसोटीमध्ये त्याने फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी केली. कसोटीमध्ये त्याने पाच शतकं झळकावली आहेत. यापैकी चार शतकं तर त्याने २०१६ मध्ये झळकावली. आतापर्यंत त्याने ६४ कसोटी सामन्यांमध्ये २९१४ धावा केल्या असून १९५ बळी घेतले आहेत. त्याने कसोटीमध्ये १४ अर्धशतकंही झळकावली आहे. त्याने कसोटीमध्ये एकादा १० तर ५ वेळा ५ बळी घेण्याची कामगिरीही केलीय.

नक्की वाचा >> IPL 2021: “मी असतो तर कर्णधारपद सोडलं असतं”; ‘त्या’ कृतीमुळे संतापला गौतम गंभीर

सर्वोत्तम स्ट्राइक रेट
मोईनने आपल्या कसोटी कारकिर्दीमध्ये अनेकदा भन्नाट कामगिरी केल्याचं पहायला मिळालं आहे. २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना त्याने चार कसोटी सामन्यांमध्ये २५ बळी घेतले होते. तर २०१८-१९ मध्ये या ऑफ स्पीनरने श्रीलंका आणि वेस्ट इंडीजविरुद्धच्या सहा कसोटी सामन्यांमध्ये ३२ बळी घेतले होते. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांपैकी केवळ डेरेक अंडरवूड आणि ग्राम स्वान यांनीच मोईनपेक्षा६ अधिक बळी घेतले आहेत. एका खेळीमध्ये सर्व १० बळी घेणाऱ्या जिम लेकरहूनही मोईनचं स्ट्राइक रेट अधिक आहे. मोईनचा स्ट्राइक रेट हा ६०.७० इतका आहे.