आयपीएल २०२१चा अंतिम सामना आज (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स (CSK vs KKR) यांच्यात होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. विक्रमी नऊ वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या चेन्नईने ही चमकदार ट्रॉफी तीन वेळा जिंकली आहे, तर कोलकाता तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचा प्रयत्न करेल. केकेआरचा संघ सात वर्षांनंतर आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. केकेआरने चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून २०१२ मध्ये पहिले विजेतेपद पटकावले.

या हंगामाबद्दल बोलायचे झाले, तर चेन्नईने केकेआरला दोन्ही वेळा पराभूत केले आहे. भारतात झालेल्या पहिल्या लेगमध्ये चेन्नईने केकेआरचा १८ धावांनी तर यूएईने लेगमध्ये दोन गडी राखून पराभव केला.

चेन्नई वि. कोलकाता सामन्याबाबत सर्वकाही…

आयपीएल २०२१ चा अंतिम सामना किती वाजता सुरू होईल?

आयपीएल २०२१ चा अंतिम सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजता खेळला जाईल. नाणेफेक संध्याकाळी सात वाजता होईल.

हा सामना कुठे होणार?

आयपीएल २०२१ चा अंतिम सामना आज शुक्रवार १५ ऑक्टोबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल.

हेही वाचा – T20 World Cup : भारताविरुद्धच्या सामन्याला ९ दिवस उरले असताना पाकिस्तानला बसला ‘मोठा’ धक्का!

हा सामना टीव्हीवर कुठे पाहता येईल?

आयपीएल २०२१ ची अंतिम फेरी स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित केली जाईल.

या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

तुम्ही हॉटस्टारवर या सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. यासह, आपण लाइव्ह अपडेटसाठी https://www.loksatta.com/krida/ या वेबसाइटला भेट द्या.