scorecardresearch

अमित मिश्राकडून मैदानात चूक; पंचांनी गोलंदाजी रोखली!

नेमकं काय घडलं पाहा

अमित मिश्राकडून मैदानात चूक; पंचांनी गोलंदाजी रोखली!

आयपीएल २०२१ स्पर्धेत करोनामुळे खेळाच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. त्यात खेळाडू बायो बबलमध्ये राहून क्रिकेट खेळत आहेत. आयपीएल स्पर्धेपूर्वी काही खेळाडूंना करोनाची लागणही झाली. तसेच काही परदेशी खेळाडू करोनाच्या भीतीने मायदेशी परतलेत. त्यामुळे करोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्यात अमित मिश्रानं नव्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पंचांनी त्याला फटकारलं. तसेच गोलंदाजी रोखत चेंडू आपल्याकडे घेत चेंडू सॅनिटाइज केला.

बंगळुरुविरुद्धच्या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतनं सातवं षटक अमित मिश्राला सोपवलं. मात्र पहिला चेंडू टाकताना सवयीप्रमाणे त्याने चेंडूला लाळ लावली. ही बाब तिसऱ्या पंचाच्या लक्षात आल्यानं त्यांनी त्याला गोलंदाजी करण्यास रोखलं. मैदानातील पंचांना याबाबत सूचना दिली. तिसऱ्या पंचाच्या सूचनेनुसार मैदानातील पंचानी चेंडू आपल्या ताब्यात घेतला आणि सॅनिटाइज केला. त्याचबरोबर अशी कृती पुन्हा करू नको असा इशाराही दिला. अमित मिश्रानेही आपली चूक कबूल करत असं पुन्हा घडणार नाही असं सांगितलं. ही चूक अमित मिश्राकडून पुन्हा घडल्यास त्याला ५ धावांची पॅनल्टी लावली जाईल.


बंगळुरु विरुद्धचा रोमहर्षक सामना दिल्लीनं अवघ्या एका धावेनं गमावला. बंगळुरुने विजयासाठी १७१ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र दिल्लीचा संघ ४ गडी गमवून १७० धावा करू शकला. या सामन्यात अमित मिश्राने ३ षटकं टाकली. त्यात त्याने २७ धावा देत एक गडी बाद केला. ग्लेन मॅक्सवेलला त्याने तंबूचा रस्ता दाखवला.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ ( Ipl2021 ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या