IPL 2021 : रविवारपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेआधीच चाहत्यांसाठी BCCI ची मोठी घोषणा

मुंबई विरुद्ध चेन्नई सामन्याने उर्वरित स्पर्धेचं पर्व सुरु होणार असून दुबई, शारजा आणि आबु धाबीमधील मैदानांवर आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत.

IPL Fans
आयपीएलने केली मोठी घोषणा (प्रातिनिधिक फोटो सौजन्य फेसबुकवरुन साभार)

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चे उर्वरित पर्व रविवारपासून सुरु होत असून आयपीएलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बुधवारी आयपीएल आयोजन समितीने दिलेल्या माहितीनुसार या आयपीएलसाठी मैदानामध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. १९ सप्टेंबर म्हणजेच रविवारी पाचवेळा ही स्पर्धा जिंकणारा मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील तीनदा आयपीएल विजेता राहिलेल्या चेन्नई सुपरकिंग्सच्या संघाशी सामना खेळणार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेचा संघ मैदानात उतरणार असून हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

“हा सामना आमच्यासाठी खास असणार आहे कारण आयपीएल आता त्यांच्या चाहत्यांचं स्टेडियममध्ये स्वागत करण्यासाठी सज्ज झालं आहे. करोना परिस्थितीमुळे असणाऱ्या निर्बंधांमुळे असणारी चाहत्यांच्या उपस्थितीवरील बंदी उठवण्यात आलीय,” असं आयपीएलने म्हटलं आहे. १६ सप्टेंबरपासून या सामन्यांची तिकीट चाहत्यांना विक्रीसाठी उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच iplt20.com वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच latinumList.net या वेबसाईटवरुनही तिकीटं विकत घेता येतील.

दुबई, शारजा आणि आबु धाबीमधील मैदानांवर आयपीएलचे उर्वरित सामने खेळवले जाणार आहे. करोना नियमांचे पालन करुन आणि युएई सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसार या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पहिल्या सत्रामध्ये आयपीएल २०२१ मध्ये २९ सामने खेळवण्यात आले. मात्र खेळाडूंना करोना संसर्ग झाल्याने अनिर्णित काळासाठी आयपीएल स्थगित करण्यात आलं होतं. त्यानंतर आयपीएल युएईमध्ये घेण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलाय. टी २० विश्वचषक स्पर्धा १९ ऑक्टोबरपासून याच ठिकाणी खेळवली जाणार असल्याने बीसीसीआयने येथेच सामने खेळवण्याचा निर्णय घेतलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2021 fans to be allowed back into stadiums as league resumes scsg

ताज्या बातम्या