आज इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलमध्ये इतिहास घडणार आहे. आज एकाच वेळी दोन सामने खेळवले जाणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना अबू धाबी येथे सुरु होणार आहे. तर त्याचवेळी दुबईच्या मैदानामध्ये रॉयल चँलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमने-सामने असतील. बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच नियोजित वेळापत्रकामध्ये बदल करत दुपारी साडेतीनचा मुंबई हैदराबाद सामना पुढे ढकलत एकाचवेळी दोन वेगळ्या मैदानांवर सामने खेळवण्याचं निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बीसीसीआयने काय सांगितलं?
बीसीसीआयने निवेदन जारी करून बदलेल्या वेळापत्रकाबद्दल माहिती दिली होती. आयपीएलमध्ये एकाच वेळी दोन सामने खेळण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे. सहसा, जेव्हा-जेव्हा आयपीएलमध्ये डबर हेडर म्हणजेच एकाच दिवशी दोन सामने असतात तेव्हा एक सामना दुपारी साडेतीन वाजता आणि तो संपल्यानंतर दुसरा संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून खेळला जातो. परंतु यावेळी प्रथमच दोन्ही सामने एकाच वेळी खेळले जातील. आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

नक्की वाचा >> IPL 2021 Playoffs: सामान्याचा निकाल दूरच राहिला टॉसच ठरवणार ‘मुंबई इंडियन्स’ आत की बाहेर?

का बदलण्यात आला निर्णय?
आयपीएलचे शेवटचे दोन साखळी सामने राहिले असले तरी अंतिम चार संघ आणि त्यांचं स्थान या सामन्यांवर अवलंबून असल्याने आधी झालेल्या सामन्याचा चुकीच्या अर्थाने एखाद्या संघाला फायदा होऊ नये म्हणून सामने एकाच वेळी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

मुंबईला चौथ्या स्थानासाठी संधी…
दडपणाखाली कामगिरी उंचावण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या मुंबई इंडियन्सला अद्यापही यंदाच्या हंगामात बाद फेरी गाठता आलेली नाही. त्यामुळे शुक्रवारी सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या ‘आयपीएल’मधील निर्णायक साखळी सामन्यात पाच वेळा विजेत्या मुंबईला ‘जिंकू किंवा मरू’ या धोरणासह खेळावे लागणार आहे. गतविजेत्या मुंबईने मागील लढतीत राजस्थान रॉयल्सवर तब्बल ७० चेंडू राखून विजय मिळवल्याने त्यांची निव्वळ धावगती झपाट्याने वाढली. मात्र तरीही १३ सामन्यांत १२ गुण कमावणाऱ्या मुंबईला हैदराबादविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

कर्णधार रोहित शर्मा (३६३ धावा), इशान किशन आणि सूर्यकुमार यादव या आघाडीच्या त्रिकुटावर मुंबईच्या फलंदाजीची भिस्त आहे. जेम्स नीशामच्या समावेशामुळे मुंबईला फलंदाजीसह गोलंदाजीमध्येही अतिरिक्त पर्याय उपलब्ध झाला आहे. जसप्रीत बुमरा (१९ बळी), ट्रेंट बोल्ट आणि नॅथन कुल्टर-नाइल या वेगवान त्रिकुटाकडून मुंबईला पुन्हा चमकदार कामगिरीची अपेक्षा आहे. दुसरीकडे, हैदराबादचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी मागील सामन्यात बेंगळूरुला नमवल्याने त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. त्यामुळे स्पर्धेची विजयी सांगता करतानाच मुंबईचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न उद्ध्वस्त करण्याचे केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील हैदराबादचे ध्येय असेल.

दुसऱ्या स्थानासाठी विराटचा संघ करणार प्रयत्न
तर दुसरीकडे दिल्लीला पराभूत करुन विराट कोहलीच्या आरसीबीचं ध्येय हे दुसऱ्या स्थानावर झेप घेण्याचं असेल. मात्र यासाठी त्यांना मोठा विजय मिळवावा लागणार आहे.

कोणता सामना कुठे पाहता येणार?
पण एकाच वेळी हे दोन्ही सामने असल्याने ते नक्की कुठे आणि कसे पाहता येणार याबद्दल चाहत्यांमध्ये संभ्रम आहेत. जाणून घेऊयात कुठे दिसणार आहेत हे सामने…

५५ वा सामना – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स</p>

कुठे दाखवला जाणार? – स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स ३, स्टार गोल्ड २, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट

लाइव्ह स्ट्रीमिंग अॅप – डिस्ने-हॉटस्टार

५६ वा सामना – रॉयल चँलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपीटल्स

कुठे दाखवला जाणार? – स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, तेलगू/तमीळ/कन्नड
लाइव्ह स्ट्रीमिंग अॅप – डिस्ने-हॉटस्टार

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 here is how you can watch srh vs mi and rcb vs dc matches simultaneously on tv online scsg
First published on: 08-10-2021 at 11:06 IST