करोना संकटामुळे आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे. आयपीएल पुन्हा कधी आणि कुठे खेळवायचं याचा निर्णय नंतर परिस्थितीनुसार घेतला जाईल असं बीसीसीआयकडून स्पष्ट करण्यात आलं. आयपीएल स्थगित झाल्याने खेळाडू आपापल्या घऱी जाण्यासाठी निघाले आहेत. यावेळी अनेक परदेशी खेळाडूंना निर्बंधांमुळे मायदेशी जाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान मुंबई इंडियन्सने परदेशी खेळाडू सुखरुप मायदेशी पोहोचावेत यासाठी चार्टर्ड विमानांची व्यवस्था केली आहे. Cricbuzz ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएल सप्टेंबरमध्ये?

मुंबई इंडियन्स आपल्या संघातील परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने पाठवणार आहे. ही विमानं दक्षिण आफ्रिकामार्गे न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजसाठी उड्डाण करतील. मुंबई इंडियन्स संघात ट्रेंट बोल्ट, अडम मिलने, जेम्स नीशम, शेन बाँड अशा न्यूझीलंडमधील अनेक खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुंबई इंडियन्सने इतर संघातील परदेशी खेळाडूंनाही सोबत येण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.

दरम्यान एक विमान पोलार्ड राहत असलेल्या त्रिनिदादसाठी उड्डाण करणार आहे. हे विमान दक्षिण आफ्रिका मार्गे वेस्ट इंडिजला जाणार आहे. क्विंटन डी कॉक आणि मॅक्रो जेनसनसहित दक्षिण आफ्रिकाचे अनेक खेळाडू यावेळी आपल्या मायदेशात पोहोचतील. हे विमान २४ तासांत निघणार आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 mumbai indians sending overseas players by own charter flights sgy
First published on: 06-05-2021 at 13:31 IST