IPL 2021: बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या खेळणार की नाही?; झहीर खान म्हणाला…

हार्दीक पांड्या अजूनही फिट नसल्याने बंगळुरूविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही?, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

Zaheer-Hardik-Pandya
(iplt20.com)

आयपीएल २०२१ स्पर्धेत मुंबई इंडियन्स दुसऱ्या टप्प्यात दोन सामने खेळली आणि दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. पहिल्या सामन्यात रोहित शर्मा खेळला नव्हता. मात्र दुसऱ्या सामन्यात त्याने पुनरागमन केलं. मात्र हार्दीक पांड्या अजूनही फिट नसल्याने बंगळुरूविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात खेळणार की नाही?, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. दोन सामन्यात पराभव झाल्याने मुंबईचा संघ आयपीएल गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. जर बंगळुरूविरुद्धचा सामनाही गमावला तर प्लेऑफ जाण्याचा मार्ग आणखी खडतर होईल. त्यामुळे संघात अष्टपैलू हार्दीक पांड्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे. पण हार्दीक पांड्या फिट आहे का? याबाबत मुंबई इंडियन्स संघाचे डायरेक्टर ऑफ क्रिकेट ऑपरेशन झहिर खाने याने माहिती दिली आहे.

“हार्दीक पांड्याने सराव करण्यास सुरुवात केली आहे. आशा आहे की, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्धच्या सामन्यापूर्वी तो फिट होईल. सध्या आमच्याकडे एक सराव सत्र आहे आणि आम्ही बघू कसं होतंय. “, असं झहिर खानने सांगितलं. हार्दीक पांड्या नसल्याने मधल्या फळीची फलंदाजी पूर्णत: ढासळली आहे. वेगाने धावा करण्याची जबाबदारी पोलार्डच्या खांद्यावर आली आहे. तर इतर फलंदाज धावा करताना झटपट बाद होत असल्याचं दिसत आहेत. मुंबई इंडियन्स आतापर्यंत ९ सामने खेळले आहेत. त्यापैकी ४ सामन्यात विजय, तर ५ सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे.

आगामी टी २० विश्वचषकापूर्वी हार्दीक पांड्या पूर्णपणे फिट होणं आवश्यक आहे. हार्दीक फिट झाल्यास संघाला प्लेईंग इलेव्हन निवडताना सोपं जाईल. हार्दीक पांड्या अष्टपैलू खेळाडू असल्याने फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये भूमिका बजावतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2021 mumbai indians zaheer khan on hardik pandya rmt

ताज्या बातम्या