आयपील २०२१ स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने संपले असून आता प्लेऑफचे सामने रंगणार आहेत. प्लेऑफमध्ये दिल्ली, चेन्नई, बंगळुरू आणि कोलकाता हे संघ पोहोचले आहेत. दिल्ली आणि चेन्नई टॉप २ मध्ये असल्याने अंतिम फेरीत जाण्यासाठी दोन्ही संघांकडे दोन संधी असणार आहेत. तर बंगळुरू आणि कोलकाताला अंतिम फेरीत जाण्यासाठी दोन लढती द्यावा लागणार आहेत. चेन्नईचा संघ सोडला तर यंदा स्पर्धेचा नवा विजेता आपल्याला पाहायला मिळू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुणतालिकेत २० गुणांसह दिल्लीचा संघ अव्वल स्थानी आहे. त्यानंतर १८ गुण आणि चांगल्या धावगतीसह चेन्नईचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर बंगळुरुचेही १८ गुण आहेत. मात्र धावगती उणे असल्याने ते तिसऱ्या स्थानावर आहेत. तर मुंबईची धावगती कमी असल्याने कोलकात्याचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे.

हेही वाचा – IPL 2021 : इशान, सुर्यकुमारची दमदार झुंज अपयशी; मुंबई इंडियन्स अखेर स्पर्धेबाहेर!

प्लेऑफचा पहिला सामना टॉप २ मध्ये असलेल्या दिल्ली आणि चेन्नई यांच्यात पहिली लढत होणार आहे. तर बंगळुरू आणि कोलकाता यांच्यात दुसऱी लढत आहे. दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील पराभूत संघाची लढत बंगळुरू विरुद्ध कोलकाता यांच्यातील विजयी संघाशी होईल.

२००८ मध्ये आयपीएलचा पहिला किताब राजस्थानने आपल्या नावावर केला होता. डेक्कन चार्जर्सने २००९, चेन्नईने २०१० आणि २०११, कोलकाताने २०१२, मुंबईने २०१३, कोलकाताने पुन्हा २०१४, त्यानंतर मुंबईने २०१५, २०१६ मध्ये हैदराबादने, २०१७ मध्ये मुंबईने, २०१८ मध्ये चेन्नईने, तर २०१९ आणि २०२० मध्ये मुंबईने आयपीएल किताबावर नाव कोरले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 playoffs matches and chances of getting a new winner rmt
First published on: 09-10-2021 at 00:01 IST