‘‘तुम्ही दोघे Laysच्या पाकिटासारखे”, गेल-चहलच्या ‘त्या’ फोटोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

पंजाब किंग्जनेही विराटसेनेला केले ट्रोल

gayle and chahal
गेल आणि चहल

काल आयपीएल २०२१मध्ये झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर ३४ धावांनी विजय मिळला. या विजयासह पंजाब गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. ख्रिस गेल, हरप्रीत ब्रार यांनी पंजाबच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या सामन्यानंतर पंजाबने एका फोटोवरून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ट्रोल केले. पंजाबच्या या ट्विटनंतर चाहत्यांनीही या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

सामना जिंकल्यानंतर पंजाब किंग्जने ख्रिस गेल आणि युजवेंद्र चहलचा एक मजेदार फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला, ज्यामध्ये दोन्ही खेळाडू आपल्या जर्सीशिवाय उभे राहिले होते. शरीरसौष्ठव स्पर्धेत पोज देतात, तशी पोज गेल-चहलने या फोटोत दिली. गेलच्या पिळदार शरीरयष्टीसमोर चहलचे काटक शरीर, अशा आशयाचे ट्विट करत पंजाबने बंगळुरूला कमकुवत म्हटले. ख्रिस गेलने बंगळुरूविरुद्ध ४६ धावांची शानदार खेळी खेळली, त्यामध्ये त्याने चहलच्या एकाच षटकात २ जबरदस्त षटकार ठोकले.

 

गेल-चहलच्या फोटोवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

 

 

 

पंजाबचे आव्हान कायम

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (आरसीबी) झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जचा (पीबीकेएस) अष्टपैलू खेळाडू हरप्रीत ब्रारने चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केले. फलंदाजीत हरप्रीतने २५ धावांचे योगदान दिले, तर गोलंदाजीत त्याने विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलला बाद करत बंगळुरूचे कंबरडे मोडले. या कामगिरीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. पंजाबने ५ गडी गमवत १७९ धावा केल्या होत्या आणि विजयासाठी १८० धावांचे आव्हान दिले होते. मात्र बंगळुरुचा संघ ८ गडी गमवून १४५ धावा करू शकला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ipl 2021 punjab kings troll rcb with gayle chahal shirtless photo adn

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या