विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु संघ यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सलग तीन विजयांसह गुणतालिकेच्या अग्रस्थानी विराजमान आहे. त्यामुळे गुरुवारी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या लढतीत राजस्थान रॉयल्स त्यांचा विजयरथ रोखणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मुंबई इंडियन्स, सनरायजर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्सला नमवल्यानंतर बेंगळूरु प्रथमच मुंबईत खेळणार आहे. त्यामुळे येथील परिस्थिती तसेच खेळपट्टीशी जुळवून घेण्याचे त्यांच्यापुढे आव्हान असेल. दुसरीकडे संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानला गेल्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध पराभव पत्करावा लागला. त्यामुळे बेंगळूरुला पराभूत करून विजयी मार्गावर परतण्याचे त्यांचे ध्येय असेल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु

मॅक्सवेल-डीव्हिलियर्स धोकादायी

एबी डिव्हिलियर्स, ग्लेन मॅक्सवेल सध्या सर्वोत्तम लयीत असल्यामुळे बेंगळूरुचा संघ घातक ठरत आहे. कर्णधार कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्याकडूनही संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. गोलंदाजीत मोहम्मद सिराज प्रभावीपणे नेतृत्व करत असून हर्षल पटेल स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी विराजमान आहे. फिरकीपटू यजुवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि शाहबाज अहमद मधल्या षटकांत धावांच्या गतीवर रोख लावत आहेत. त्यामुळे बेंगळूरुचा संघ सर्व पातळ्यांवर समतोल वाटत आहे.

राजस्थान रॉयल्स

आघाडीच्या फळीवर भिस्त

सॅमसन, जोस बटलर आणि मनन वोहरा या आघाडीच्या तीन फलंदाजांवर राजस्थानची प्रामुख्याने भिस्त आहे. शिवम दुबे आणि रियान पराग अद्याप अपेक्षित अष्टपैलू योगदान देऊ शकलेले नाहीत. त्यामुळे या दोघांपैकी एकाला वगळून यशस्वी जैस्वाल किंवा अन्य एखाद्या युवा खेळाडूला संधी मिळणार का, हे पाहणे रंजक ठरेल. ख्रिस मॉरिस सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरत आहे. युवा चेतन साकारियाने मात्र अप्रतिम गोलंदाजी करत लक्ष वेधले आहे.

*  वेळ : सायंकाळी ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोटर््स १, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोटर््स १ हिंदी